कीन्ही जवादे येथे आरोग्य शिबीर संपन्न

 कीन्ही जवादे येथे आरोग्य शिबीर संपन्न                  

      

 राळेगाव तालुका प्रतिनिधि-विलास साखरकर                    

ग्रामपंचायत कीन्ही जवादे, स्पेक्ट्रम फौंडेशन इंडिया, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व श्रीमद् भागवत आयोजन समितीच्या वतीने कीन्ही जवादे येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

गावातील  ४०० चे वर नागरिकांनी याचा लाभ घेतला.मोफत औषधी वाटप करण्यात आले.

या करीता सुधीर जवादे सरपंच, उपसरपंच रमेश तलांडे, सचिव सुनील येंगडे, स्पेक्ट्रम फौंडेशन चे राहुल मीलमीले , आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे ची वैद्यकीय चमु भागवत आयोजन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी पुंडलिकराव लोणबले मारुती ईठाळे, धनराज तोडसाम, आशा वर्कर सुशीला मेश्राम, प्रगतीशील शेतकरी नरेंद्र ठाकरे, प्रणय वाढई मनोज् लोणबले, चंद्रकांत लेनगूरे, भागवत समितीचे भगवंतराव लोणबले, प्रविण ठाकरे महाराज, प्रल्हाद आदे महाराज, मेश्राम महाराज , महादेव काळे, गणेश वाढई, बाबाराव सीडाम, मोरेश्वर ठाकरे, विनोद सीडाम, अमोल भोयर,पवन खैरकार,विनोद कावडे, रमेश वाढई, मधुकर ठाकरे, शंकर ठाकरे,सचीन येंडे, गौरव चवरडोल, पोलिस पाटील अनुराग जवादे, पत्रकार मंगेश चवरडोल, श्रीकांत कावडे यांनी सहकार्य केले.भागवत सप्ताहात आरोग्य शिबीर, महसूल विभागाचे समाधान शिबीर,क्रुषी विभागाचे योजनेच्या माहिती चे शिबीर, आयोजित करून लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येऊन आदर्श भागवत करण्याचे आयोजन समितीचे प्रयत्न आहे.पंजाबराव नागपुरे यांचे हस्ते आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆








●●●●●●●●●●●●●●जाहिरात●●●●●●●●●●●●●●



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या