कुंडेश्वर दर्शनाला जाणारा टेम्पो दरीत कोसळला नऊ ठार 28 हून अधिक जखमी

 खेड अपघात 

कुंडेश्वर दर्शनाला जाणारा टेम्पो दरीत कोसळला नऊ ठार 28 हून अधिक जखमी 



प्रतिनिधी: योगेश आल्हाट

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वर येथील शिव मंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पीक टेम्पोला भीषण अपघात झाला. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास नागमोडी वळणावरून घाट चढताना टेम्पो रिटर्न आल्याने तो 100 फूट दरीत कोसळला .


या दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 30 पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी झाले. जखमी मधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त 

 करण्यात आली आहे .


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा टेम्पो कुंडेश्वर येथील शिव मंदिराच्या दर्शनासाठी 35 ऊन अधिक भाविकांना घेऊन जात होता. यामध्ये बहुतांश महिला भाविक होत्या. अपघाताच्या वेळी वाहनाने पाच ते सहा पलट्या खाल्ल्या. ज्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिका मधून जवळच्या चांडोली ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले . 10 रुग्णवाहिकांचा वापर करून बचाव कार्य करण्यात आले. 


खेड पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा वेग, चालकाचा निष्काळजीपणा, किंवा रस्त्याच्या परिस्थितीमुळे अपघात घडला असावा अशी शक्यता आहे. नागमोडी वळनावर व घाट रस्त्यावर अशा घटना वारंवार घडत असल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .


यापूर्वीही खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ 14 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या अपघातात पाच महिलांचा मृत्यू आणि 13 जण जखमी झाले होते. त्यामुळे या भागातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


मयत नागरिक महिला 


शोभा ज्ञानेश्वर पापळ 

सुमन काळूराम पापळ 

शारदा रामदास चोरगे 

मंदाक आणि दरेकर 

संजीवनी कैलास दरेकर 

मिराबाई संभाजी चोरगे 

बायडाबाई न्यानेश्वर दरेकर 

शकुंतला तानाजी चोरगे 


उपचार घेत असलेले नागरिक 


पाईट येथे स्थानिक पातळीवर उपचार झालेले नागरिक 


अलका शिवाजी चोरगे 

रंजना दत्तात्रय कोळेकर 

मालुबाई लक्ष्मण चोरगे 

जया बाळू दरेकर 


पोखरकर हॉस्पिटल खेड 


लताताई करंडे 

ऋतुराज कोतवाल 

निकिता पापळ 

जयश्री पापळ 


गावडे हॉस्पिटल 


शकुंतला चोरगे 

मनीषा दरेकर 


शिवतीर्थ हॉस्पिटल 


लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर 

कलाबाई मल्हारी लोंढे 

जनाबाई करंडे 

फसाबाई सावंत 

सुप्रिया लोंढे 

निशांत लोंढे 


केअरवेल हॉस्पिटल चाकण 

सिद्धी ज्ञानेश्वर पापळ 


वांबळे हॉस्पिटल 


कविता सारंग चोरगे 

सुलाबाई बाळासाहेब चोरगे 

सिद्धी कार रामदास चोरगे 

शोभाबाई निवृत्ती पापळ 


साईनाथ हॉस्पिटल भोसरी 


सुलोचना कोळेकर 

मंगल शरद दरेकर 

पुनम वनाजी पापळ  

जाईबाई वनाजी पापळ 


साळुंखे हॉस्पिटल खेड 


चित्रा शरद करंडे 

शांताबाई दत्तात्रय दरेकर 

मला चांगदेव पापळ 


कल्याण पुणे एसटी अपघात 


त्याचवेळी, पुण्यात आणखी एक अपघात घडला. कल्याण हून पुण्याकडे येणाऱ्या एसटी बसचे चाक निखळल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या दोन्ही घटनांनी पुण्यातील रस्ते सुरक्षेच्या समस्येवर प्रकाश टाकला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या