श्रीश्री ज्ञानमंदिर देवजाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्कारातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.
पुणे प्रतिनिधी : योगेश आल्हाट
श्री श्री ज्ञानमंदिर शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक 5 मार्च 2025 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्कारातून भारतीय संस्कृतीचे नाविन्यपूर्ण दर्शन घडवले. यामध्ये योगा डान्स, देशभक्तीपर गीते, आदिवासी नृत्य, गोवा साउथ थीम, कोळीगीत, देवीचा गोंधळ, गुजराती नृत्य, श्रीकृष्ण थीम, गणपती थीम, आणि संत गोरा कुंभार अशा विविध नृत्यप्रकारांची सादरीकरणे करण्यात आली.
कार्यक्रमातील संत गोरा कुंभार या थीमने उपस्थित सर्व प्रेक्षकांचे डोळे पाणावले. झाशीची राणी या नृत्यानंतर सर्व मान्यवर आणि प्रेक्षक भावूक झाले. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटकाने झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन प्रत्यक्ष घोड्यावरून झाले. तो क्षण अतिशय दैदिप्यमान आणि विलक्षण होता.
कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, स्थानिक सेवा समितीचे अध्यक्ष आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे खंबीर नेतृत्व, सन्माननीय श्री. तुषार देवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले.
सदर कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शक माननीय श्री. योगेश वैद्य सर यांचे बहुमोल सहकार्य लाभले. वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्तम वातावरणात पार पडावे यासाठी श्री श्री ज्ञानमंदिर शाळेतील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. नाविन्यपूर्ण अशा या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनुजा देवकर यांनी केले, तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश थोरात सर यांनी मानले.
0 टिप्पण्या