नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळा देवळी येथे योग दिन साजरा
नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे योग दिन साजरा करण्यात आला. शाळेतील क्रीडा शिक्षक श्री.शरद सूर्यवंशी, श्री.साहेबराव निकम व श्री.भूषण बहिरम यांनी योगाचे महत्त्व व उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योगासन विविध आसनांचा सराव करून घेतला.
यावेळी मुख्याध्यापक श्री.सतिष पाटील, अधिक्षक श्री.विनोद देसले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले.
0 टिप्पण्या