नवी मुंबई विमानतळास हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे : ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनचे निवेदन

 नवी मुंबई विमानतळाला आदरणीय वंसतराव नाईकांचे नाव दया.

ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन






चाळीसगाव (प्रतिनिधी)  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक तथा नवी मुंबईचे शिल्पकार वसंतरावजी नाईक यांचे कर्तुत्व राज्यासह देशालाही गौरवान्वित करणारे आहे.

   महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करीत असताना त्यांनी मोठ्या दूरदृष्टीने नवी मुंबई उभारणी केली. तत्कालीन विरोधी पक्षांनी नव्या मुंबईच्या निर्मितीला प्रचंड विरोध दर्शविला होता. परंतु दूरदृष्टी असणारे विकासाचे महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी नवी मुंबई उभारली हे देशभर सर्वश्रुत असताना त्यांच्या या अद्वितीय कार्याच्या सन्मानार्थ नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक साहेबांचे नाव देणे अतिशय समर्पक आणि उचित ठरेल.

   आधुनिक महाराष्ट्राला घडवणाऱ्या नाईक साहेबांच्या सन्मानार्थ भरीव आणि ऐतिहासिक असे आजवर काही दिसून आले नाही हे दुर्देवी आहे वसंतरावजी नाईक जन्मशताब्दी वर्ष अंतर्गत प्रस्तावित अनेक बाबी आजही प्रलंबित आहेत. हे अतिशय खेदाने म्हणता येईल

साहेबांच्या अनुयायांत ओबीसी मागासवर्गीय बंजारा समाजात याविषयी प्रचंड अस्वस्थता आहे ०१ जुलै कृषी दिन वसंतरावजी नाईक जयंती या पावन पर्वावर नाईक साहेबांच्या नावाने विशेष घोषणा व निर्णय होतील.अशी आपणाकडून अपेक्षा आहे तरी कृपया नवी मुंबईचे शिल्पकार असलेले वसंतराव नाईक साहेब यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देऊन त्यांचे वसंतरावजी नाईक नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्यात यावे. ही ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन ची मागणी आहे. या आशयाचे निवेदन आज रोजी तहसीलदार अमोल मोरे यांच्या द्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा उधवजी ठाकरे साहेब मा शरदचंद्रजी पवार साहेब मा अजित दादा पवार साहेब व मा नाना पटोले साहेब यांना ही ईमेल द्वारे  देण्यात आले. यावेळी निवेदन देताना ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड अखिल भारतीय तांडा सुधार समिती महाराष्ट्र उपाध्यक्ष योगेश्वर राठोड सोसायटी माजी चेअरमन दिनकर  राठोड जिल्हा परिषद सदस्य सिताराम चव्हाण, किसन राठोड, विलास चव्हाण, आबा जाणे, दादासाहेब चव्हाण, भीमराव जाधव, अनिल चव्हाण, विलास जाधव, रुपेश जाधव, विनोद राठोड, जगन राठोड, राहुल राठोड उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या