चाळीसगाव : राखी पौर्णिमेनिमित्त, बहिणी भावाला राखी बांधून शुभेच्छा देतात आणि भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देतो. हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेम आणि संरक्षण-आपुलकीचे प्रतीक आहे.
या भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या अचूक नात्याची आठवण ठेवत ,रक्षाबंधन निमित्त चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा येथील सर्व बंजारा समाजाच्या लाडक्या भगिनींनी राज्याच्या विकासात अत्युच्च कामगिरी करणारे लाडके मुख्यमंत्रीदेवा भाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना राख्यांची भेट पाठवून बहिणीच्या सुरक्षा व रक्षणाची जबाबदारी टाकली आहे .
'देवा भाऊच्या राज्यात
आनंदाने राहू , सुखात राहू ' .
अशा घोषणा देत
चैतन्य तांडा येथील ग्रामपंचायत च्या कार्यालयात सकाळी तांड्यातील सर्व भगिनींनी एकत्रित येऊन राज्याच्या विकासात अमुलाग्र बदल घडवून आणणारे जनसामान्यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी पाठवण्याचा निर्णय घेतला .
यावेळी माजी सरपंच अनिता राठोड यांचे सह , ग्रामपंचायत चे सर्व माजी पदाधिकारी उपस्थित होते .आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा देऊन गोरगरिबांच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी महिला शक्ती संघटितपणे या चैतन्य तांडातून उभी राहिली .
चैतन्य तांड्यातील महिलांनी दिलेली राखीची चैतन्यमय भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिक ऊर्जा देईल असा विश्वास यावेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी व्यक्त केला .
0 टिप्पण्या