चाळीसगाव- प्रतिनिधी:- गाव विभाजण,गावठाणविस्तार,नवीन तांड्यांना वस्तीला महसुल दर्जासह ग्रामपंचायत स्थापन अशा विविध मागण्यां शासन दरबारी नेण्यासाठी नुकतेच एक समिती गठीत करण्यात आली आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २० रोजी दुसरी बैठक उत्साहात पार पडली. संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीबाबत नुकतेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चार सदस्यीय समिती तीन वर्षांकरिता गठीत करण्यात आली आहे. यात अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत पाटील, सचिव गटविकास अधिकारी शेख व अशासकीय सदस्य म्हणून दिनकर राठोड , संतोष राठोड आदींचा समावेश आहे. दरम्यान संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना, लमान तांडा घोषित करणे, गावठाण जाहिर करणे, तांड्याला महसूली गाव तयार करण्यासाठी कार्यवाही करणे तसेच ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत कार्यवाही करणे यांसह विविध अंमलबजावणीबाबत या समितीकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.दर महिन्यात बैठक होणार आहे आज २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता याची दुसरी बैठक येथील प्रशासकीय इमारतीत तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सचिव गटविकास अधिकारी शेख, अशासकीय सदस्य दिनकर राठोड व संतोष राठोड उपस्थित होते.
0 टिप्पण्या