देवळी आश्रमशाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी
नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक मुख्याध्यापक श्री.तुषार खैरनार व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माध्यमिक मुख्याध्यापक श्री.सतिष पाटील यांनी दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन केले.
कार्यक्रमात गीत, पोवाडा व वक्तृत्व सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती.सरला महाले यांनी मांडले तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे चरित्र श्री.रमाकांत कापडणीस, श्री.विनोद पाटील तसेच शाळेतील विद्यार्थी सीमा पावरा, निलम बारेला यांनी मांडले.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.सरला महाले यांनी तर आभार श्री.साहेबराव निकम यांनी मानले.
0 टिप्पण्या