जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन व रक्षाबंधन उत्साहात साजरा

 देवळी आश्रम शाळेत जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन व रक्षाबंधन उत्साहात साजरा



नानासो.उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवळी येथे जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन तसेच रक्षाबंधन हे सण उत्साहात साजरा करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य श्री.सतीश पाटील तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.आदित्य दादा सूर्यवंशी, संचालक श्री.ऋषिकेश सूर्यवंशी, देवळी गावाचे सरपंच श्री.अरुणभाऊ गायकवाड, शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक श्री.तुषार खैरनार यांनी दिपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन केले. 



       कार्यक्रमाची सुरुवात गावात प्रभात फेरी काढून करण्यात आली त्यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे सादर करण्यात आले. तसेच वीर एकलव्य भगवान यांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.जितेंद्र सूर्यवंशी यांनी मांडले तर शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी गीत, नृत्य व नाटिका सादर केल्या. तसेच लेझीम पथक व ढोल पथक यांनी आपल्या कला सादर केल्या. शाळेतील शिक्षिका श्रीमती.संगीता पाटील यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. 

        आज रक्षाबंधन असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींनी राखी बांधली तसेच शाळेतील वृक्षांना देखील राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला तसेच शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

         कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधीक्षक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.शरद सूर्यवंशी, श्री.भूषण बहिरम, श्रीमती.दिपमाला जाधव, श्री.सागर बोरसे तसेच सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन पाटील यांनी केले तर आभार श्रीमती.सुरेखा पाटील यांनी मांनले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या