गुजरातच्या सोने चोरणाऱ्या गँग ला अटक

 वयोवृद्ध नागरिकांचे हात चलाखीने सोने काढून घेणाऱ्या गुजरात राज्यातील गड्डी गॅंगला आळेफाटा पोलिसांकडून अटक .




पुणे प्रतिनिधी : योगेश आल्हाट 

दिनांक 26 /09/2023 रोजी दुपारी दोन वाजण्याचे सुमारास आळे ,ता. जुन्नर , जि. पुणे येथील चिचकाइ मळा येथे सदर घटना घडली. फिर्यादी भागुबाई श्रीपत सहाणे (वय 59 )हे पायी घरी जात असताना ,दोन अनोळखी इसमांनी त्यांचा पाठलाग केला . फिर्यादीस मावशी तुम्ही एकटेच चालला आहात . त्यामुळे तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र व हाताच्या बोटातील अंगठी हे रुमालात बांधून ठेवा .असे बोलल्याने फिर्यादीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याच्या अंगठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे रुमालात बांधून पिशवीत ठेवली असता , सोन्याचे दागिने हे हातच्यालाखीने काढून घेऊन फसवणूक केले बाबत आणि फाटा आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 626/ 2023 भादवि कलम 420. 34 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश तायडे यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकास सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथक हे सदर गुन्ह्यातील आरोपीचा व गुन्ह्यातील फसवणूक करून चोरून नेलेल्या सोन्याचे दागिने यांचा शोध घेत असताना. अशा प्रकारे वयोवृद्ध नागरिकांचे सोन्याचे दागिने चोरी करणारे टोळी गुन्हे करण्यासाठी महाराष्ट्रात येणार असल्याची गोपनीय बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली असल्याने , सदर माहितीच्या आधारे सापळा रचून अत्यंत शिताफीने सिन्नर टोल नाका येथे सर्व आरोपींना अटक केली . तसेच हुंडाई कंपनीचे i20 वाहन क्रमांक GJ 01 KE 25 55 यासह आरोपी सुरज हसमुख भाई राजपूत (वय 25 वर्षे रा. कीज कोळी सर्कल बडोदा गुजरात), राहुल हसमुख भाई राजपूत (वय 21 वर्ष रा.कीज कोळी सर्कल बडोदा गुजरात ) ,हरी गंगाराम भावरी राठोड (वय 50 वर्ष रा. नोबेल नगर, कोंढियार नगर, जिल्हा अहमदाबाद, गुजरात.) बबलू बीरचंद सोलंकी (वय 27 रा.मौला सभागृह ,नागपूर महाराष्ट्र )यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता ,त्यांनी सदरचे सोने हे गौरव चंद्रकांत पटेल (रा. महाकाली सोसायटी, पादरा, ता.पादरा जि.बडोदा गुजरात) विकले असल्याचे कबुली दिली, असल्याने नमूद सोनारास गुन्ह्याच्या तपास कामी अटक करण्यात आले, असून त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे .


आळेफाटा पोलीस स्टेशन गु .र .न.कलम 

626 / 2023 भा .द .वि. कलम 420, 411, 34 


शिरूर पोलीस स्टेशन 965 / 2024 भा.न्या. सं. 318 .3 (5) 

तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन 52 / 2025 भा. न्या. सं. 318 (4 )3 (5)


सदर आरोपींकडून हुंडाई कंपनीचे आय ट्वेन्टी वाहन क्रमांक GJ 01 KE 25 55 तसेच 40 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण आठ लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आला आहे .


सदरची कामगिरी ही श्री पंकज देशमुख सर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय रमेश चोपडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग ,माननीय रवींद्र चौधरी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग, अविनाश शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दिनेश तायडे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस सब इन्स्पेक्टर विनोद दुर्वे ',सहायक फौजदार राजेंद्र हिले, चंद्रा डुंबरे ,पोलीस हवालदार सुनील गिरी, विनोद गायकवाड ,पंकज पारखे, अमित मालुंजे, अमित पोळ, पोलीस कॉन्स्टेबल नवीन अरगडे, शैलेश वाघमारे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या