आमदारांच्या संकल्पनेतून प्रविण मराठे मिळवून देत आहेत प्रभाग-९ मधील नागरिकांना मोफत योजनांचा लाभ

 आमदारांच्या संकल्पनेतून प्रविण मराठे मिळवून देत आहेत प्रभाग-९ मधील नागरिकांना मोफत योजनांचा लाभ




 चाळीसगाव प्रतिनिधी:आमदार मंगेशदादा चव्हाण व भारतीय जनता पार्टी चाळीसगाव यांच्या संकल्पेतुन सर्व शासकीय योजनेंचा मोफत जनतेला खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देणारे भाजपा शहर सोशल मिडीयाचे प्रमुख श्री.प्रविण शिवाजीराव मराठे प्रभाग क्रं.९ हिरापूर रोड चाळीसगाव यांचे सर्वच स्थराहून कौतुक होत असून त्यांच्यावर शाबासकीची थाप पडत आहे.


      जनतेला काय अपेक्षित आहे,त्यांचे व त्यांच्या परिवाराला शासनाच्या योजनेतून खऱ्या अर्थाने कसा लाभ देता येईल याचा अभ्यासपूर्ण माहितीची गुणवत्ता वापरून प्रभागातील सर्वच स्थरातील नागरिकांना त्यांच्या कार्यालया मार्फत गेल्या वर्षभरापासून अविरात्र सेवा पुरवत असल्या मुळे परिसरातील जनतेची खरी सेवा कशी व कोणत्या पद्धतीने करावी हे त्यांनी दाखवून दिले.

      आज पर्यंत त्यांच्या कार्यालया मार्फत प्रभागातील तसेच इतर भागातील रहिवासी यांना ई-श्रमिक कार्ड,कोरोना लसीकरण प्रमाणपत्र,आयुर्वेदिक औषधी,विधवा तसेच वयोवृद्ध नागरिकांचे मानधन, रेशनकार्ड संबधी समस्या अशा सर्वच प्रकारच्या योजनांचा मोफत लाभ मिळाला असल्या मुळे सर्वच स्थरातून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

    तसेच त्यांच्या मार्फत जनतेला सर्व शासकीय योजनेंचा कश्या प्रकारे लाभ दिला जातो याचा आढावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्याचे लाडके आमदार मा.श्री.मंगेशदादा चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य श्री.पोपट तात्या भोळे,भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री.घृष्णेश्वर तात्या पाटील,चाळीसगाव ता.पत्रकार संघाचे सचिव जेष्ठ पत्रकार श्री.एम.बी.पाटील सर,ग्रा.प.सदस्य श्री.धनंजय आप्पा मांडोळे, श्री गजुभाऊ विसपुते,श्री.भावेश कोठावदे,श्री.कैलास नाना पाटील,श्री.रामभाऊ पाटील अशा सर्वच जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्वतःहा प्रत्येक्ष श्री.प्रविण शिवाजीराव मराठे यांच्या कार्यालयात जाऊन बघितले.

    दरम्यान मोफत दिल्या जाणाऱ्या सर्वच योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार श्री.मंगेशदादा चव्हाण तसेच सर्वच जेष्ठ पदाधिकारी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या