आमदार आपल्या दारी अभियानात गोरखपूर येथे २५३ लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ,
---------------------------------
आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
---------------------------------
नवीन रेशनकार्ड, ई-श्रम कार्ड, उत्पन्न दाखले, दारिद्र्य रेषा दाखले आदींचे जागेवरच वितरण
---------------------------------
गोरखपूर (चाळीसगाव) – ग्रामीण भागातील शेवटच्या वंचित घटकाला शासकीय योजनांचा लाभ त्याच्या दारी जाऊन देण्यासाठी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून, भारतीय जनता पक्ष - युवा मोर्चा यांच्या संयोजनातून आणि तहसिल व पंचायत समिती कार्यालय यांच्या सहकार्याने “आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहोचतील घरोघरी” या अभियानाची सुरुवात गोरखपूर तांडा येथून करण्यात आली. दि.८ डिसेंबर रोजी गोरखपूर येथील श्रीराम मंदिर येथे आयोजित या शिबिरात २५३ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच गोरखपूर तांडा येथे अश्या पद्धतीने ग्रामस्थांच्या दारी येऊन एकाच दिवसात योजनेचा लाभ दिला गेल्याने ग्रामस्थांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, बाजार समितीचे माजी सभापती मच्छीद्रभाऊ राठोड, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण, चितेगावं येथील भाजपा पदाधिकारी निवृत्ती कवडे, गोरखपूर सरपंच शिवाजी प्रताप चव्हाण, भाजपा बूथप्रमुख योगेश जाधव, ग्रामसेवक देवरे भाऊसाहेब, मंडळअधिकारी कुमावत भाऊसाहेब, तलाठी कुमावत आप्पा, पुरवठा विभागाच्या देवरे मॅडम, नंदू राजपूत, भक्ती पाटील, विकी कापसे,उपसरपंच सतीबाई वाल्लू चव्हाण ग्रामपंचायत सदस्य शितल योगेश जाधव, शोबाबाई संजय जाधव, सुनीता जितेंद्र चव्हाण, ललिता सुनील राठोड, जेतीलाल उदा चव्हाण, राजेंद्र रघुनाथ जाधव, माणिक सरिचंद राठोड आदी उपस्थित होते.
सदर अभियानाचा हा पहिलाच दिवस असून यात अजून सुधारणा करून इतर गावांमध्ये व्यापक प्रमाणात हे अभियान राबविले जाईल अशी माहिती शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली. सदर ‘आमदार आपल्या दारी’ अभियानात 28 पिवळे रेशनकार्ड, 32 केशरी रेशनकार्ड, 14 रेशनकार्ड नाव वाढवणे, 03 रेशनकार्ड नाव कमी करने, 30 ई श्रम कार्ड, 53 उत्पन्नाचे दाखले, 30 बी पी एल दारिद्र्यरेषा दाखले, 31 संजय गांधी निराधार योजना अर्ज, 31 श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना अर्ज, 1 कोरोना मृत्यू ५० हजार सानुग्रह अनुदान क्लेम आदी २५३ लाभार्थ्यांना यावेळी प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयातील स्वयंसेवक, शिवनेरी फाउंडेशनचे सदस्य, गोरखपूर येथील भाजपा पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या