आळेफाटा जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मध्ये बुधवारी दिनांक 24 दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र दरोडा टाकला
प्रतिनिधी : हरिश तायडे
आळेफाटा जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मध्ये बुधवारी दिनांक 24 दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र दरोडा टाकला
पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर हे जखमी झाले असता त्यांना नारायणगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला
पुणे नाशिक महामार्ग लगत असणाऱ्या आनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे मध्ये व्यवस्थापक राजेंद्र भोर आणि लिपिक अंकिता भोर हे दुपारी जेवण करताना दोन अज्ञात इसमांनी सशस्त्र प्रवेश करून व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशांची मागणी केली व गोळीबार केला यामध्ये भोर गंभीर जखमी होऊन उपचाराकरता नेत असताना त्यांचा मृत्यू झाला चोरट्यांनी किती रक्कम लांबवली आहे याचा तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस करत आहेत
0 टिप्पण्या