चौथ्या कल्याण ट्रॉफी स्केटिंग चॅम्पियनशीप - 2021 स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर - मांडा टिटवाळा चे सुवर्ण यश -
प्रतिनिधी - हेमंत घाटाळ
दि.19/12/2021 रोजी चौथी कल्याण ट्रॉफी - स्केटिंग चॅम्पियनशीप - 2021 स्पर्धा शहाड ता.कल्याण येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका, यांच्या आयोजनाने व रिजन्सी ग्रुपच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली.
या स्केटिंगच्या चॅम्पियन स्पर्धेत 4 वर्षे वयोगटापासून ते खुल्या वयोगटातील क्वाड आणि इनलाईन स्पीड स्केटिंग इव्हेंट मध्ये 189 स्पर्धाकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत कु.उत्कर्षा रामदास गाडर ( 6 ते 8 वयोगट ) आणि कु.दक्षतनया रामदास गाडर ( 8 ते 10 वयोगटमध्ये ) प्राथमिक विद्यामंदिर -मांडा,टिटवाळा चे प्रतिनिधित्व केले.
या रोमांचकारी आणि चुरशीच्या स्पर्धेत कु.उत्कर्षा रामदास गाडर हिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळवले तर कु.दक्षतनया रामदास गाडर हिने कांस्यपदक मिळवले. या पदक विजेत्या स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय कराटेपट्टू श्री.स्वप्नील सर यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्केटिंगच्या खेळात गाडर भगिनींना विद्यालयामधून मा.मुख्याध्यापक (प्राथ.) सौ.स्वप्ना दीक्षित , वर्गाशिक्षिका सौ.काटकर मॅडम, मा.मुख्याध्यापक (माध्य.) श्री.तळेले सर आणि वर्गाशिक्षिका सौ. पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
स्केटिंग खेळातील या दमदार कामगिरीमुळे गाडर भगिनींनी विद्यामंदिर -मांडा टिटवाळाच्या विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला असून त्यांच्यावर विद्यालय व प्रशासन अभिनंदनाचा वर्षाव करत असून त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या