नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील नामवंत कलाकार सोबत पालघर जिल्हातून दोन कलाशिक्षक सहभागी .

 प्रतिनिधी : हेमंत घाटाळ

नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील नामवंत कलाकार सोबत पालघर जिल्हातून दोन कलाशिक्षक सहभागी . झाले असून फोटोच्या उजवीकडून सत्कार करताना सुप्रसिद्ध कलाकार सुबोध खर्शिकर, मा. अजय कुमार सिंग सर त्यानंतर मा. अरविंद सावंत सर, मा. अंबुरे सर आणि सत्कार स्वीकारताना चित्रकार उज्ज्वल विनायक पारगांवकर व त्यांच्या पत्नी आहेत.

मुंबई मधील वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथेएस. पी. मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने

मंगळवार दिनांक 28 डि सेंबर 2021 ते दि.2 जानेवारी 2022 रोजी पर्यंत सकाळी 11 ते7 वाजेपर्यंत सर्वांना खुले राहील. Affordable Art

Fair & Buy Art सदराखाली चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत चित्रकारांची चित्र विविध शैलींच्या माध्यमातून खास कला  पहावयास मिळेल. विशेष म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यातून 

चित्रकार जनरल एज्युकेशन सोसायटी संचालित लालबहादूर शास्त्री हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक श्री उज्ज्वल विनायक पारगांवकर तसेच श्री चित्रसेन वासुदेव पागधरे कलाशिक्षक जनता हायस्कूल

नवापूर यांचेही चित्र या प्रदर्शनात आपणास पाहता येईल 

पालघर जिल्ह्यातील या दोन कलाकाराचे विशेष चित्र कलाकृतीसाठी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध चित्रकार मा. श्री सुबोध खर्शिकर यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या चित्र प्रदर्शनाबद्दल ज्येष्ठ कलाकार अरविंद सावंत यांनी मार्गदर्शन केले. व प्रोत्साहन दिले.असे कलाप्रेमींना हे दालन कोरोनाच्या नियमांचे पालन करून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने चित्रकार श्री उज्ज्वल विनायक पारगांवकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हितगुज करता आली त्यामधून त्यांच्या आतापर्यंतच्या शैक्षणिक तथा व्यवसायिक प्रगतीचे वाटचाल अनुभवता आली. ते मूळचे गाव धुकटन (जि . पालघर) येथील रहिवासी असून यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदशाळा धुकटन येथे तर माध्यमिक शिक्षण लालबहादूर शास्त्री हायस्कूल मनोर येथे झाले. पुढील व्यवसायातील शिक्षणाचा प्रथम टप्पा फाउंडेशन कोर्स वसई दृककला महाविद्यालय येथे तर पुढील टप्पा B.F.A. हे एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट बांद्रा तसेच Dip.A.Ed. हा कोर्स जगविख्यात कॉलेज जेजे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे पूर्ण केले व मधल्या वेळेस नाईट कॉलेजच्या माध्यमातून ग्रंथपाल क्राफ्ट टीचर कोर्स, तसेच आर्ट्स मधून ग्रॅज्युएट झालेआणि आताही ते शिक्षण घेत आहेत.व्यवसायि क क्षेत्रात इंटेरियर डिझायनर (आर्ट वर्क), अमूर्त पेंटिग, ग्लास पेंटिग, म्युरल पेंटिग्स, क्लेवर्क, पोर्ट्रेट,प्रिट मेकिग आर्ट वर्क, मेटल वर्क अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेले आहे आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना व्हावा ह्या सुप्त इच्छेने वसई

गावामधील नामवंत सरकारी ग्रांटेड न्यूइंग्लिस्कूल मधील A.M या उच्च वेतन श्रेणी च्या कलाशिक्षकाचे काम सोडून त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण जेथे झाले तेथेच म्हणजे लालबहादूर शास्त्री हायस्कूल मनोर येथील ग्रामीण भागातील शाळेमध्येA.T.D या  कला शिक्षकाची नोकरी स्वीकारली. आज तेथील सर्व

विद्यार्थ्यांचे खूप लाडके शिक्षक म्हणून ओळखले जातात. दरवर्षी कि मान 70 ते80 विद्यार्थी एलिमेंटरी आणि

इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेला प्रवेशित होतात. आणि उत्तम ग्रेड श्रेणीने उत्तीर्ण होतात . कलाशिक्षणासाठी विविध कार्यक्रमाचेआयोजन करत.शासन दरबारी विविध प्रश्न मांडणे यांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात, ही माहिती देताना त्यांनी आपल्या कलाअध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश वझे सर व इतर सहकारी यांच्या कार्या बद्दल स्तुती केली. मंबईमधील प्रदर्शनासाठी आलेली संधी त्यांनी अशीच आपल्या कला शिक्षकांना संपर्क करून विभाजित करण्याचा प्रयत्न केला. त्यामधूनच श्री चित्रसेन पागधरे सरांचा व त्यांच्या चित्रांचा समावेश झाला. याबद्दल त्यांना सर्वात जास्त आनंद झाले. उत्तम कलाकार हे नेहमी पुढे यावेत . कलाकारांसाठी ठेवला पाहिजे असे ते म्हणाले.

तसेच सध्याचे मुंबईवरील संकट पाहता व कोरोनाचे सावट असतांना प्रेक्षकांनी घराबाहेर प्रदर्शनाला न जाता घरातूनच प्रसार माध्यमातून यापुढील प्रदर्शनाचा आनंद घ्यावा, असे त्यांनी सर्व जनतेला निवेदन केले आहे. अशा हरहुन्नरी कलाकाराला तसेच त्यांच्या चित्र प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. 

   Palghar जिल्हा हा कलाकारांचा जिल्हा असून वारली चित्र कला प्रसिद्ध आहे. असे अनेक कलावंत पालघर जिल्हा मध्ये असून अशा कलावंतांनी पुढे येऊन कलेचे प्रदर्शन भरावीत  असे जिल्हा पालघर चे शिक्षक भारतीचे अध्यक्ष अनिल  शेलार  यांनी  आवाहन केले.शिक्षक भारती परिवाराकडून  

या कलाकारांना पालघर जिल्हातून  अभिनंदनाचा वर्षाव कलावंत. रसिक व विद्यार्थी कडून सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे.सर्वांना खुले असणार आहे असे आयोजकडून समजले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या