आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहोचतील घरोघरी" अभियानास जुनोने येथे मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद...
चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील गोरखपूर तांडा येथून प्रारंभ झालेल्या "आमदार आपल्या दारी" अभियानास तालुक्यातील जुनोने येथे बुधवारी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. जुनोने ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून "आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहोचतील घरोघरी" अभियानास गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील गोरखपूर तांडा येथून प्रारंभ झाला आहे. या अभियानाअंतर्गत जागेवर लाभार्थ्यांना रेशनकार्ड मध्ये नविन नावे समाविष्ट करणे वा कमी करणे, विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ मिळवून देणे तसेच ई-श्रम कार्ड नोंदणी करून लगेच कार्ड बनवून देने यांच्यासह अनेक शासकीय लाभ मिळवून देण्यात येत आहे. गोरखपूर तांडा झाल्यानंतर बोढरे व त्यानंतर बुधवार रोजी तालुक्यातील जुनोने येथे सदर अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी तालुका समन्वय दिनकर भाऊ राठोड, तालुका पुरवठा अधिकारी देवरे मॅडम, मंडळ अधिका
री योगेश सोनवणे, तलाठी गुरव आप्पा, कृषी सहाय्यक तुफान खोत, नंदूभाऊ राजपूत, माजी महिला तालुकाध्यक्ष नमोताई राठोड, ग्रामसेवक दिपक देवकर, सरपंच गोरखनाथ राठोड, उपसरपंच मोरे, आत्माराम पवार व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयातील सहकारी अशोक राठोड, पवन देवरे, योगेशभाऊ महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल नकवाल, राहुल राठोड, गजानन चव्हाण तसेच रूपाली पाटील, हेमंत पाटील, रेशन दुकानदार कोळी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य माऊली वाणी, भाऊसाहेब, विकास राठोड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान पुढील अभियान हे तालुक्यातील पाटणा येथे शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ मिळवून घ्यावा असे आवाहन तालुका समन्वयक दिनकर भाऊ राठोड यांनी केले आहे.
0 टिप्पण्या