कळवण विहिरीत पडलेल्या बिबट वन्य प्राण्याला एक ते दोन तासात काडले बाहेर त्यास मिळाले जीवदान.

 कळवण    विहिरीत पडलेल्या बिबट वन्य प्राण्याला एक ते दोन तासात काडले बाहेर त्यास मिळाले जीवदान.               

                       

   कळवण प्रतिनिधी- अनिल ठाकरे      

  कळवण तालुक्यातील मौजे चींचोरे  येथील. श्री. वामान रामा साबळे यांच्या मालकीचे गट . नं. ५६  मधील विहिरीत बिबट हा वन्य प्राणी पडलेला आढळून आल्याने पोलीस पाटील श्री. सोमनाथ कवर व संजय सांबळे यांनी भ्रमनध्वणीद्वारे वनविभागास कळविले. की मौजे चिंचोरे येथील. वामन जोपळे यांचे मालकी गट क्र. ५६ मधील  विहिरीत बिबट हा वन्य प्राणी पडलेला आहे. त्या वरुन मा. वन परीक्षेत्र अधिकारी कळवण (प्रा) यांचे मार्गदर्शनाखाली रेसक्युटीम तयार करुन तात्काळ  घटनास्थळी धाव घेत विहिरीत पिंजरा सोडून बिबट या वन्य प्राण्यास विहिरीतून सुरक्षित रित्या एक ते दोन तासांत सुख रुप बाहेर काढण्यात यश आले. व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडून बिबट वन्य प्राण्यांची तपासणी करुन कळवण येथे सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले. व वरीष्ठ कार्यालया कडून आदेश प्राप्त करुन सदर प्राण्यास नैसर्गिक अधिवासात बिबट याला सुखरुप मुक्त करण्यात आले. व बिबट याला आपले सुखाचे जिवदान मिळाले. व यावेळी      


              सदर बिबट रेस्क्यु मोहिमेत वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी  मा. व्ही. बी. पाटील साहेब व वनपरीमंडळ अधिकारी एस. डी. वाघ, वाय. एस. निकम, डि. डि. बागुल, वनरक्षक के. जी. पाल व श्रीमती. एस. भोये, कु. एम. बी. भोये, पी. एम. देवरे व अनिल गुजांळ व बहीरम व तसेच वनविकास महामंडळाचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने बिबट रेस्क्यु मोहीम यशस्वी रीत्या पार पाडण्यात याले. व बिबट या वन्य प्राणी  याला आपले सुखाचा  जीवदान मिळाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या