ग्रीन गोल्ड सीड्स प्रा.लि.- औरंगाबाद यांच्यातर्फे माकुणसार जि.पालघर येथे भातशेती पिक पाहणी व शेतकरी चर्चासत्राचा कार्यक्रम संपन्न

 ग्रीन गोल्ड सीड्स प्रा.लि.- औरंगाबाद यांच्यातर्फे माकुणसार जि.पालघर येथे भातशेती पिक पाहणी व शेतकरी चर्चासत्राचा कार्यक्रम संपन्न

     

हेमंत घाटाळ ( पालघर प्रतिनिधी )


                 ग्रीन गोल्ड सीड्स प्रा. लि.औरंगाबाद यांच्यावतीने व ग्रीन गोल्ड सीड्सच्या बी- बियाण्यांचे विविध ठिकाणचे वितरक यांच्या सहकार्याने व जिल्हा प्रतिनिधी - विष्णु गाडर यांच्या आयोजनाने पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून जव्हार,मोखाडा,विक्रमगड,डहाणू,तलासरी आणि पालघर इ.ठिकाणी पिक पाहणी व शेतकरी चर्चासत्राचे कार्यक्रम सुरु असून त्याच्याच एक भाग म्हणून दि.22/10/2021 रोजी माकुणसार ग्रामपंचायतमधील प्रगतशील शेतकरी श्री मिलिंद हरिचंद्र म्हात्रे यांच्या घराजवळील भातशेतीमध्ये आणि भव्य प्रांगणात कंपनीच्या गोल्ड -78 संशोधित भात शेतीच्या पिक पाहणीचा कार्यक्रम संपन्न झाला. या आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये  शेतीला जोडधंदा दुग्धव्यवसाय असल्यामुळे जिल्हा प्रतिनिधी विष्णु गाडर हे भातशेतीच्या सखोल माहितीबरोबरच चारा पिक ज्वारी गोल्ड -54 चे देखील महत्व पटवून देत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

         या कार्यक्रमाला माकुणसार ग्रामपंचायतचे सरपंच मा.श्री. अमोल मोहिते हे अध्यक्ष तर पालघर पंचायत समितीच्या सदस्या मा.सौ.मीनाताई धोडी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. तसेच पालघर पंचायत समिती सदस्य मा.श्री.सुभाष म्हात्रे साहेब,अंकुर कृषी सेवा केंद्राचे चालक श्री.आशिष पाटील व सौ.हर्षला कुडू इ.मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

         कार्यक्रमाची सुरुवात प्रगतशील शेतकरी श्री.मिलिंद हरिचंद्र म्हात्रे यांनी ग्रीन गोल्ड सीड्स प्रा.लि. औरंगाबाद यांच्या गोल्ड -78 या संशोधित भात बियाण्याची लागवड करून अतिशय उत्तम आणि दर्जेदार भातशेतीच्या प्लॉट ला उपस्थित मान्यवर आणि शेतकरी यांनी भातशेतीची पिक पाहणी करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

          कार्यक्रम प्रसंगी प्रगतशील शेतकरी श्री. मिलिंद हरिचंद्र म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि पालघर पंचायत समिती सदस्या सौ.मीनाताई धोडी यांनी उपस्थित शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. तर अंकुर कृषी सेवा केंद्र - सफाळेचे चालक श्री.आशिष पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आपल्या कृषीक्षेत्रातील अनुभव आणि अभ्यासाने उपस्थित शेतकऱ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करून येथील शेताकऱ्यांच्या हितासाठी पालघर पंचायत क्षेत्रात शासकीय भात खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी केली.त्यानंतर पालघर पंचायत समिती सदस्य - श्री. सुभाष म्हात्रे साहेब यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले व या परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासकीय भात खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नक्कीच पाठपुरावा करू असे शेतकऱ्यांना आश्वाशीत केले.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अमोल मोहिते साहेब, सरपंच ग्रामपंचायत - माकुणसार यांनी शेतकरी हितासाठी आपली ग्रामपंचायत कायम कटीबद्ध असून माकुणसार ग्रामपंचायत कठीण परिस्थितीत देखील नेहमीच शेतकऱ्यांच्यासोबत आहे.असे त्यांनी अध्यक्षीय भाषणात  सांगितले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

       कार्यक्रम प्रसंगी ग्रीन गोल्ड सीड्स प्रा.लि.औरंगाबाद यांच्यावतीने  कार्यक्रमातील मान्यवरांचे सहृदयी स्वागत करून शेतकऱ्यांसाठी उत्तम आसनव्यवस्था आणि अल्पोपहाराची व्यवस्था करून भातशेतीच्या पिक पाहणी कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे आयोजन केले होते.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन गोल्ड सीड्स प्रा.लि.औरंगाबाद चे जिल्हा प्रतिनिधी श्री.विष्णु गाडर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री.रामदास गाडर सर यांनी केले.


 *" ग्रीन गोल्ड सीड्स प्रा.लि.औरंगाबाद यांची सर्वच बी -बियाणे दर्जेदार असून कंपनीचे प्रतिनिधी चांगल्याप्रकारे सेवा देत आहेत. तालुक्यात प्रथमच भातशेती पिक पाहणी व चर्चासत्राचा अतिशय चांगला आणि स्तुत्य कार्यक्रम होत असल्यामुळे  ग्रीन गोल्ड सीड्स  प्रा.लि औरंगाबाद यांच्याबद्दलचा कृषी सेवा केंद्र व शेतकरी यांचा कायम विश्वास वाढत जाणारा आहे."* 

        - आशिष पाटील (अंकुर कृषी सेवा केंद्र - सफाळे जि.पालघर )


          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कर्षा मंडप डेकोरेटर्स - घानवळ ता.मोखाडा, कु.सचिन वझरे, संतोष वारघडे आणि म्हात्रे कुटुंबातील सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या