म.फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या.नाशिक जिल्हा ..

 कळवण प्रतिनिधी- अनिल ठाकरे

      म.फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर  शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या.नाशिक जिल्हा ..

आज म. फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक या जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सौ.जयश्री रंगनाथ बागुल तर व्हा. चेअरमन पदी सौ. मनिषा तुकाराम हिरे ( कापडणे ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदी पंचवीस वर्षानंतर महिलांना संधी मिळाल्याने संचालक मंडळ व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

           दुपारी ठिक 12: 30 निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी मा.मनिषा खैरणार मॅडम यांनी सुरुवात करून सर्व नियमांच्या अधीन राहुन निर्धारित वेळेत सौ. जयश्री रंगनाथ बागुल यांचा एकमेव अर्ज आल्याने सर्व प्रक्रिया पूर्ण करून चेअरमन पदी सौ जयश्री रंगनाथ बागुल यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.निवडीनंतर आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.निवृत्ती मामा तळपाडे ,मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तथा संचालक  मा.बी.जे.सोनवणे समता शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा संचालक राजेशजी भोसले यांनी मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित चेअरमन,व्हा चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या. संचालक मंडळातील श्री. मोतीराम पवार, राहुलजी सोनवणे, विलासजी पोतदार, सुभाष लोहकरे,यांनी मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मावळते चेअरमन मा. गावित सर यांचे संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

निवड प्रक्रिया प्रसंगी संचालक मा.गरूड सर,केसकर सर तसेच सभासद रंगनाथ बागुल, वाल्मिक कापडणे व्यवस्थापक मा.शरद गरूड साहेब, कर्मचारी बळवंत हिरे, राजेश सैदाणे आदी.हजर होते. 

सौ.जयश्री बागुल मॅडम व सौ.मनिषा हिरे--कापडणे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून संचालक मंडळ व व्यवस्थापक , कर्मचारी यांच्या समन्वयातून संस्था वाढीसाठी पार दर्शक कारभार करून प्रामाणिक काम करू असे सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या