अखेर कॉंग्रेसला शहराध्यक्ष मिळाला ; कैलास कदम यांची शहराध्यक्षपदी वर्णी
प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस ला 11 महिन्यांनी शहराध्यक्ष मिळाला आहे. महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के सी वेणुगोपाल यांनी निवडीची घोषणा केली आहे.
तत्कालीन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी 11 नोव्हेंबर 2020 रोजी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे 11 महीणे त्यांच्या कडेच जबाबदारी होती. साठे यांची राज्य कार्यकारिणी सचिवपदी वर्णी लागलीत्यानंतर काँग्रेसने शहराध्यक्षपदी कदम यांची निवड केली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे.
कदम यांनी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पद , पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य या महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. व ते जनमाणसात अंत्यत लोकप्रिय , व सर्व सामान्याच्या मदतीला धाऊन जाणारे म्हणुण जनमाणसात परिचीत आहेत. ते इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनी कामगार क्षेत्रात अतिशय भरीव काम केले आहे. तसेच त्यांनी कोकणातील असंख्य बांधवांना एकत्र करून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोकण विकास महासंघाची स्थापना केली. आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांचे शहराध्यक्षपदी निवड झाली.
0 टिप्पण्या