पारोळ्यात महाराष्ट्र बंद ला सर्व पक्षीय पाठिंबा
लखीमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ आज मविआच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला पारोळा शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर दुर्दैवी घटना घडली. याघटनेचा निषेध म्हणुन आज मविआच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी पारोळा शहरात या बंद ला समिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी मविआच्या वतीने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना भावपुर्ण श्रध्दांजली देण्यात आली. नंतर सर्व पक्षीय नेत्यांनी बाजार पेठतुन फिरून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. या आवाहनाला साथ देत शहरातील बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. दुपार नंतर मात्र काही दुकाने उघडण्यात आली.
यावेळी मा. पालकमंत्री डाॅ, सतिष पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख डाॅ. हर्षल माने, पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अमोल पाटील, पारोळा काँग्रेस तालुका अध्यक्ष पिरन अनुष्ठान, मनोराज पाटील, दौलत पाटील यांचा सह शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या