आरोग्य विभागाचा ढोसळ कारभार . . . .
रेस्कु पथकांची वाहने व रेस्कु पथकातील वैद्यकीय अधिकाय्रांना आरोग्य केंद्रात बसुन पगार. . . .
प्रतिनिधी : अजय लहारे
विक्रमगड तालुक्यातील आरोग विभागाचा ढोसळ कारभार समोर आलेला आहे. रेस्कु पथकांची वाहने व रेस्कु पथकांचे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात बसुन पगार घेत असल्याचे माहीती अधिकार समोर आलेले आहे,प्रा.आ.केंद्र तलवाडा अंतर्गत येणारे प्रा. उपकेंद्र मेढी व आरोग्य पथक वेहलपाडा येथे भेट देता चक्क प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला व रेस्कु पथकांना कुलुप लावुन बंद ठेवलेले दिसुन आले. संबंधित आजु-बाजुच्या ग्रामस्थांना विचारना करता प्राथमिक उपकेंद्र मेढी वेळे आधि परिचारीकेने बंद करुन गेल्याचे समजले व वैद्यकीय अधिकारी डॉ.कांबळे कधी-कधीच येतात असे ग्रामस्थांनी सांगितले तर रेस्कु पथक खुप दिवस बंद ठेवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.प्राथमिक उपकेंद्र मेढी व रेस्कु पथकांची साफ-सफाई नसल्याचे द्रूष्य बघुन नक्कीच तेय़ील कर्मचारी न येता प्रा.आ.केंद्र तलवाडा येथे बसुन पगार घेत असतील असे सांगणे पुरेसे खोटे ठरणार नाही.जर आरोग्य विभागाचा कारभार असा चालत असेल वैद्यकीय कर्मचारी असे वागत असतील तर आरोग्याचा प्रश्न सुटेल का? किंवा सामान्य माणसांना सुविधा भेटतील का? असे अनेक प्रश्नांची उत्तरांचा शोध वरिष्ठ अधिकारी देतील का? याच्याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे.
0 टिप्पण्या