पिंपळेखुर्द येथील जि.प.शाळे साठी शालेय व्यवस्थापन समितीने उचलला सिंहाच वाटा
कळवण प्रतिनिधी-अनिल ठाकरे
मोहबारी! मॉडेल स्कुल आदर्श शाळा निर्मिती साठी व गुणवत्तपुर्ण दर्जेदार प्राथमिक शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने चांगला उपक्रम हाती घेतल्याने महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हातुन व प्रत्येक तालुक्यातुन दोन दोन शाळेचे मॉडेल स्कुलची निवड करण्यात आल्याने हा उपक्रम खुपच चांगला असल्याने व यात योग्यच ते शाळेची निवड केल्याने यात कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पुनद खोर्यातील आदिवासी ग्रामीण भागातील पहिली शाळा जिल्हा परिषद शाळा पिंपळेखुर्द तर दुसरी शाळा कळवण येथील मुले नंबर एक अशा या दोन शाळा तालुक्यातुन मॉडेल स्कुलसाठी सन २०२० - २१ मध्ये निवड करण्यात आले त्यातच महाराष्ट्र शासनाने मॉडेल स्कुल म्हणून जि.प.शाळा पिंपळेखुर्द या शाळेची निवड केल्यानी यात देखील शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे परिपूर्ण शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी १००% प्रयत्न होणार व विद्यार्थ्यांच्या भवितव्य उज्वल होणार असे शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवीदास पवार सर व शिक्षकवृंद कर्मचारी यांनी यावेळी सांगितले तसेच यातच मोठ्या उत्साहाने शाळा व्यवस्थापन समितीने व गावातील जेष्ठ नागरिकांनी चांगलाच जोर धरून आठवड्यातून प्रत्येक मंगळवारी बैठका होतात व यात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी शाळेसाठी श्रमदान हा उपक्रम हाती घेतला व यातच शाळेचे ग्रांऊड आखणी, रस्ता आखणी, शालेय परस बाग निर्मिती व वृक्षारोपण शाळेची रंगरंगोटी असे विविध उपक्रम टप्प्याटप्याने नियोजन करून हाती घेतले जात आहे. व या सर्व नियोजनासाठी कैलासभाऊ बहिरम, व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र बहिरम, कृष्णा बागुल, सोमनाथ महाले, नामदेव गवळी, मोतिलाल बागुल, बाबुलाल बागुल, भरत पवार, देविदास ठाकरे, दिलीप बागुल, निलेश महाले, केशव बागुल, सावळीराम बागुल यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व यावेळी सांगितले की पुढील एक ते दोन वर्षानी आम्ही ही शाळा लवकरच आंतरराष्ट्रीय शाळा बनू आसे यावेळी सांगितले गेले होते. तर यात गावाला शाळेचा अभिमान व शाळेला गावाचा आधार असा हा गावाचा व शाळेचा एक जिवाळ्याचे नियोजन मोठ्या उत्साहाने व आनंदाने दिसून आले.
0 टिप्पण्या