'दवाळी तोन मेरीया' प्रेरणादायी दिवाळी अंक..
-----------------------------------------
दमाळ प्रकाशन ,चंद्रपूर यांनी नोव्हेंबर 20 मध्ये मध्ये एक दिवाळी अंक प्रकाशित केला .
त्याच संपादक केलं आहे. गोविंद व्ही. पवार (वाकडोत ) यांनी.
'दवाळी तोन मेरीया' या शीर्षकाचा हा दिवाळी अंक आहे.जवळपास दहा लोकांचं संपादकीय मंडळ आहे. बी. गणेश करमठोट यांनी दमाळ प्रकाशना मार्फत प्रकाशित केलेल्या खूप चांगली बांधणी आहे.
या अंकाचं मुखपृष्ठ सुद्धा Inmind Studio यांनी खूप सुंदर केलेलं आहे.
बंजारा समाजातील लहान मुलींचा खूप छान छान सांस्कृतिक वेशभूषा असलेली छायाचित्रे आहेत. त्याच सोबत त्या कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी केलेलं काम त्या कामाचं कौतुक सुद्धा मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर आहे.
समाजामध्ये वाचनाची चळवळ सुरू झाली. आणि वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी सामाजिक जाणीव विकास ते पूर्ण करण्यासाठी खूप छान पद्धतीने त्यांनी
अंक निर्माण केला आहे.
या अंकामध्ये अनेक कर्मचारी बांधवांचे अनुभव मराठी व गोरबोलीत शब्दबद्ध करण्यात आले आहे.
क्रांतिकारी सेवाभाया,या काही कविता ,त्यासोबत 'नोकरी करताना समाजिक काम कसं करावं' हा प्रकाश पवार यांचा लेख ,'कर्मचारी व सामाजिक बांधिलकी' हा लेख लेंगी संदर्भातल्या संकलित कविता.
व्यसन, तलफ छोडो,शिक्षणणेर गोडी हा श्रीदेवी सुदाम राठोड (महिला पोलीस नाईक) यांनी लिहिलेला सुंदर असा लेख .
पोलीस दलात त्या कार्यरत आहेत. त्यांनी खूप सुंदर पद्धतीने कवितांचा संदर्भ देत आपल्या पोलिस विभागाचं कर्तव्यही पार पाडलं.
तुम्हाला सांगताना मला आनंद वाटतो त्यांनी वेगवेगळे उदारण सुद्धा या माध्यमातून दिलेले आहे.
सहाय्यक लेखाधिकारी सुभाष चव्हाण यांचा लेख सुद्धा या मध्ये आहे.
त्यासोबत क्रांतिकारी सेवाभाया ही कविता कुमारी कोमल गोविंद पवार.
हिची कविता आहे.
कर्मचारी संघटनेची गरज काय असा एक लेख बी. गणेश यांनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये खूप विस्तृत माहिती त्यांनी दिलेले कुठे त्यांनी मदत केली काय केलं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन काय बदल घडून येतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
प्राध्यापक संदीप चव्हाण यांनी लिहिलेल्या 'कृषकांचा कैवारी महानायक वसंतराव नाईक' या लेखातून वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या मध्ये केलेला आहे .
पोलीस हवालदार सुदाम राठोड यांचा 'गोर वहिवाट' यासंदर्भातला एक उदाहरणसह लेख प्रसिद्ध केलेला आहे .
याअकामध्ये कवी राहुल पालतीया यांची 'विचार पेरा' या नावाची कविता खूपच सुंदर आहे .
'क्रांती पेरा पेरताणी,
जगावा सोभीमानी आत्मा
लंडीबुचीन पार करन
कलमेती करा खात्मा'
लेखणीचं चे महत्व सांगणारी, विचारांचे महत्त्व विशद करणारी कविता लेखन वाचन वैचारिक चळवळीला गती देते.
प्रेरणादायी आत्मकथा अंतर्गत
मी शिवाजी बोलतोय या लेखातून,
यशाची शिखरे पादाक्रांत करून पी.एस.आय. पदावर कार्यरत असलेल्या शिवाजी राठोड यांचा संघर्ष, प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि अनुभवांची त्यांनी केलेली सगळी मांडणी या लेखामध्ये केलेले आहे. समाजातील नवतरुणांना हा लेख नक्कीच एक नवी दिशा देईल.
सुधीर चव्हाण यांनी सुंदर पद्धतीने त्यांच्या सगळ्या आठवणीवर लिहिलेले आहे. समस्याग्रस्त तांड्यात राहून, मोहफुल वेचत,बक-या चारत, स्वच्छंदी जीवन जगणारा छोरा ,अपयश पचवूनही
शिक्षण व गुणवत्ता यांच्या पाठींब्याने महाराष्ट्र शासनाच्या 'सेवार्थ' उपक्रमाचा प्रमुख कसा होतो. हा जीवनपट
प्रेरणादायी आत्मकथा अंतर्गत वाचतांना खूप आनंद होतो.
भविष्यात सुधिर यांच्या संघर्षावर ' तांडेर छोरा,महाराष्ट्रेर चमकतो तारा.'
असा प्रेरणादायी लघुपट तयार होऊ शकतो.
लहान मुली कु. सिमरन व कोमल यांच्या साहित्य लेखन क्षेत्रातील पदार्पणाचं स्वागत केलं पाहिजे.
गोविंद वाकडोत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा जो दिवाळी अंक संपादित केला त्याबद्दल त्यांचे खरोखरच अभिनंदन करावसं वाटतं.
भविष्यात जेव्हा असा अंक तयार कराल तेव्हा अधिकाधिक लोकांना यामध्ये सहभागी करा आणि दिवाळी अंकाची परंपरा चालू ठेवा. याच शुभेच्छा देतो .
धन्यवाद 🙏
✍️
एकनाथ गोफणे.
★ संपादक ★
'स्वच्छंदी भरारी ई- दिवाळी अंक' .
Swachhandibharari2021@gmail.com.
(8275725423)
1 टिप्पण्या
जय सेवालाल, दवाळी तोन मेरीया अती उत्अंतम व सार्थ नावाने प्रकाशित दिपावली अंक आहे. संपादकीय मंडळीसमोर हार्दिक अभिनंदन. कसे उपलब्द होईल, सांगावे.
उत्तर द्याहटवा