'लस लेलो लस' माहितीपटाद्वारे लसीकरण संदर्भात जनजागृती.........
चाळीसगाव -( प्रतिनिधी )
येथील 'स्वच्छंदी भरारी गृपतर्फे', कोरोना रोखण्यासाठी लसीकरणाचं महत्व पटवून देणा-या 4 मिनीटांच्या 'लस लेलो लस' या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.सुसंगत विषय मांडणी व सहज मनोरंजक शब्दलेखन व बालकलाकार भुषण ची भुमिका रसिकांना आवडल्याचे दिसून येत आहे.
उपक्रमशिल शिक्षक ध्रुवास राठोड व अहिराणी बोली अनुवादक नितीन खंडाळे,संगणकतज्ञ प्रमोद पवार यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लसीकरणाचे महत्व सांगत, माणसांच्या मनातील भिती, अंधश्रद्धा दूर, करुन लसीकरण करण्याचा आग्रह धरण्याची मध्यवर्ती संकल्पना या माहितीपटाची आहे.गोरबोली भाषेत हा माहितीपट जनजागृती करणार आहे .सहज सोपी भाषाशैली, प्रसंगनिहाय संवाद, व विविध बाहूल्यांसह कलाकार यांच्या सादरीकरणाने माहितीपट रंजक व उद्बोधक ठरला आहे. नाट्यकलावंत,प्रा.शिक्षक एकनाथ गोफणे यांनी लेखन निर्मिती व दिग्दर्शन केले असुन, गोफणे परिवारातील जयवंत, कैलास, घनश्याम, पद्मश्री, भुषण, श्रीकांत व सौ.मोना व सौ.दुर्गा गोफणे यांनी अभिनय, पार्श्वध्वनी, चित्रीकरण, संकलंन आदी बाजू भक्कम सांभाळली आहे. युट्युबवर हा माहितीपट प्रदर्शित झाला आहे.
गेल्यावर्षी सुद्धा कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये #StayHome
वर आधारित गोरबोलीत माहितीपट निर्माण करण्यात आला होता.
यापुढे सुद्धा अशाच सामाजिक विषयांवर दर्जेदार माहितीपट प्रदर्शित करण्यात येतील असे एकनाथ गोफणे यांनी सांगितले.
1 टिप्पण्या
कुटुंब रंगलय कोरोना प्रबोधनात !!
उत्तर द्याहटवा💐💐👍👍