केंद्र व राज्यशासनाच्या आदेशाला केराची टोपली


लॉकडाऊन मधे बृहन्मुंबई महापालिकेतील सर्व दिव्यांग कर्मचारी/अधिकारी यांना कर्तव्यावर येण्यापासून अजुनही सुट नाही.


असे असताना देखील बृहन्मुंबई महापालिकेतील दिव्यांग कर्मचारी अधिकारी कसेबसे कर्तव्य बजावत आहेत,या बांधवांचे जर बरेवाईट झाल्यास याला जबाबदार कोण?

 याबाबतीत अपंग(दिव्यांग) कर्मचारी संघटनेच्या वतीने आयुक्तसाहेब यांना ईमेलद्वारे आठवण देऊनही अजून परिपत्रक प्रसिद्ध झाले नाही.



मुंबई प्रतिनिधी(अशोकराव चव्हाण),दि.१६'मे.- मुंबई संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना केंद्र व राज्य शासनाने दि.३/५/२०२१ रोजी १ परिपत्रक प्रसिद्ध करुन राज्यातील सर्व खात्यातील दिव्यांग कर्मचारी व अधिकारी यांना लॉकडाऊन कालावधीत आपल्या कर्तव्यावर येण्यापासून सवलत दिलेली आहे.याबद्दल महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी संघटनेच्या वतीने मा.केंद्र व राज्यशासनाचे लाख-लाख धन्यवाद व अभिनंदन.

        परंतु, या वर्षातील २'रा लॉकडाऊन सुरु झालेला आहे तरीदेखील बृहन्मुंबई महापालिकेच्या या परिपत्रकाचा काहीच फायदा होताना दिसत नाही.कारण,बृहन्मुंबई महापालिकेतील सर्वसामान्य कर्मचारी हे १५% उपस्थितीमधे काम करत आहे.परंतु,दिव्यांग कर्मचारी यांची रोगप्रतिकारक क्षमता ही सर्वसामान्य व्यक्तीच्या तुलनेने खूपच कमी असते हे आपणा सर्वांना माहितच आहे आणि हे कर्मचारी एकमेकांच्या आधारावर व स्पर्शाने चालूच शकत नाही.

        कोरोना हा आजार एकमेकांच्या स्पर्शाने व सामाजिक अंतर(सोशल डिस्टंस) न राखल्याने पसरत आहे.म्हणून बृहन्मुंबई महापालिकेत बरेच दिव्यांग कर्मचारी बांधव हे अंध आहेत त्यामुळे गेल्या वर्षी देखील या बांधवांना अखेर उच्च न्यायालयात जाऊन याचिकेद्वारे न्याय मिळवावा लागला होता. म्हणून व्यक्तीस या आजाराचा फार मोठा सामना करावा लागत आहे.

            याबाबतीत महाराष्ट्र राज्य अपंग(दिव्यांग) कर्मचारी संघटना-मुंबई विभागाच्या वतीने दि.५/५/२०२१ पासून आजपर्यंत राज्याचे लाडके मुख्यमंत्री-ना.उद्धवसाहेब ठाकरे,उपमुख्यमंत्री-ना.अजितदादा पवारसाहेब,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री-ना.धनंजयजी मुंडेसाहेब,आरोग्यममंत्री-ना.राजेशजी टोपेसाहेब,बृहन्मुंबई महापालिका आयुक्त-मा.ईकबालसिंग चहलसाहेब,अतिरिक्त आयुक्त,सहाय्यक आयुक्त,मा.महापौर-किशोरीताई पेडणेकर,प्रमुख कर्मचारी अधिकारी-बृहन्मुंबई महापालिका यांना ईमेलद्वारे याविषयीचे निवेदन तथा विनंती पत्र पाठवले आहेत.

       तरी,बृहन्मुंबई महापालिकेतील मा.आयुक्तसाहेब  यांनी सामाजिक मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि या दिव्यांग बांधवांना होणाऱ्या त्रासापासून सुटका होण्यासाठी तात्काळ केंद्र व राज्यशासनाच्या परिपत्रकाच्या आधारावर १ परीपत्रक प्रसिद्ध करुन या दिव्यांग कर्मचारी अधिकारी बांधवांना न्याय द्यावा असे नम्र आवाहन महाराष्ट्र राज्य अपंग(दिव्यांग) कर्मचारी संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष-अशोक चव्हाण यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या