चाळीसगाव प्रतिनिधी
गुजरात अंबुजा प्रकल्प आणि पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणी....
मा. महोदय;
चाळीसगाव खडकी एमआयडीसी आणि परिसरातील औद्योगिक प्रकल्प. दि. २१ मे रोजी गुजरात अंबुजा प्रकल्प आणि पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणी ऑनलाईन झूम वर झाली. चाळीसगाव तालुका जवळपास ६/७ लाख लोकसंख्या असलेला तालुका आहे. सुनावणी केवळ १०० लोकांची मर्यादा ठेऊन होती, यात हरकत? त्या १०० लोकातून प्रत्यक्ष अनुभव घेऊन सुनावणीला सामोरे गेले किती, महत्वाच्या मुद्यांना उजाळा दिला गेला का, सुनावणी ही पर्यावरण विषयक जाहीर सुनावणी होती, मात्र त्यात किती पर्यावरण तज्ञांनी सहभाग घेतला होता. अथवा पर्यावरण प्रेमी हजर होते का? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. ज्या भागात हा प्रकल्प उभारला गेला त्या भागातील किती लोकांना सहभागी केले. भूमिहीन शेतकरी, भूमिपुत्र,यांचे मुद्दे विचाराधीन झालेत का?प्रकल्प उभारणी ते आजवर प्रकल्प उभारणी बाबत स्थानिक अनभिज्ञ,सर्व स्तरातील कायदे तज्ञ, पर्यावरण प्रेमी,पर्यावरण तज्ञ,औद्योगिक क्षेत्र,भूमिहीन शेतकरी, भूमिपुत्र, कार्यक्षेत्रातील गावातील प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी मिळून प्रश्नाची उकल साध्य झाली असती.... लिहायचं कारण की,मला देखील १०० च्या मर्यादा असल्याने सहभागी होता आले नाही. मी काही तज्ञ नाही. येथे सांगेन. परंतु जे परिक्षेत्र सांगितले त्यातील माझे गाव कंपनीने सांगितलय प्रमाणे ६ किमी अंतरावर आहे. म्हणून गावातील व्यक्ती म्हणून चर्चेत सहभागी झालो असतो... असो...कालची चर्चा खडकी येथील माझे वैचारिक सहकारी मित्र प्रल्हाद सावंत, संदीप मांडोळे, गणेश पवार. यांचा सहभागाने मोलाचं योगदान दिले. त्यांचं अभिनंदन करतो. ग्राम हितासाठी नेहमीच पुढे येताना नेहमीच चळवळीतून सक्रिय बाजू मांडत असतात. सकारात्मक प्रतिसाद, उत्साह त्यांच्यात पहिला.१०/१२ वर्षाच्या मैत्रीत चळवळी विषयक चर्चा करणे, वैचारिक मंथन झालं. त्याच उदाहरण हा चर्चेतील सहभाग सांगता येईल. त्या मीटिंगला इतरही मंडळींनी त्यांना प्रोत्साहन दिले, मात्र फारसे सकारात्मक , समर्पक उत्तर न मिळाल्याने गावात पुन्हा चर्चा होण्याचे संकेत त्यांनी मला दिले, प्रत्यक्ष सहभाग न नोंदवता आल्याने. मी त्यांच्या संपर्कात राहून माहिती जाणून घेतली...काही जाणकारांनी महत्वाची मुद्दे दिले त्याचंही अभिनंदन करेल. कारण बदल घडेल. सहकार्य होईल ही आस आजही तरुणाईत आहे. हे मात्र निश्चित आहे......
कंपनीने कोणते मुद्दे मांडले ते बघूयात
१)पाणी व्यवस्थापन.२)वाऱ्याचा प्रवाह ३) पर्यावरण मूल्यांकन ४)उत्पादने उप_उत्पादने ५) द्रणेज नकाशा ६)आराखडा ७)इथेनॉल निर्मिती प्रक्रिया ८)आरोग्य आणि सुरक्षा ९)वायू प्रदूषण आलेख १०)प्राथमिक अभ्यास ११) पर्यावरण आणि जैव विज्ञान १२)प्रकल्प आवश्यकता १३)पर्यावरण प्रभाव १४) घन कचरा व्यवस्थापन १५)१०km अभ्यास क्षेत्र नकाशा १६)गूगल image १७) satellite image १८) नमूना स्थान....
प्रभाव क्षेत्र गावे...
१) खडकी ३km. २) तांबोळे ६.५km ३) हिरापुर ४km ४) बिलाखेड ४km ५) भोरास. ६) बेलगंगा धरण ७km ७) तितुर नदी ४.५km तसेच देवळी,तळेगाव,* ही गावे दाखवली चाळीसगाव शहरासह...जमिनीचा वापर,संयुक्त पर्यावरण जबदरी..वरील रचना कंपनीने आपल्या बचावासाठी समोर मांडली.
वरील माहिती सुनावणी वेळी किती लोकांना ज्ञात होती?व अभ्यासली? कायद्याची बाजू मांडणारे सोडून, जनतेला जन सुनावणीला सामोरे जावे लागेल असे असताना. या मुद्यांचा तपशील घेणे.,अभ्यासणे गरजेचे होते.त्यानुसार उत्तरेही अपेक्षित होती. आपल्याच परिसरातील युवा वर्ग यातून लांब, निरुत्साह राहिला. मोजकेच तरुणांनी सहभाग नोंदवला अथवा लढ्यात सहभागी झालेत...असो...
स्थानिक मुद्दे काय म्हणतात याची उत्तरे आम्हाला हवीत
१)प्रकल्प आराखडा ज्या
त्रिज्येत मांडला त्या गावाची अंतराची तफावत आहे. उदा..खडकी ३km, तांबोळे ६.५km, तीतुर नदी ४km दाखवली गेली.हा पोरखेळ कंपनी करत आहे.
२)प्रदूषणाची हवा काय km च्या रस्त्याने येणार का?३)चिमणीची उंची ६९ मीटर अंतरावर आहे,तेथून धुरडे सोडणार तर रेड झोन क्षेत्र कसे ठरवले याचा खुलासा कंपनी कसा करणार?
४)कंपनीला दिवसाला १०लाखाच्या वर पाणी लागते हे पाणी कुणाच्या घशातून दिले जाते?
५) दुष्काळात होरपळणाऱ्या गावांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा केला जातो..हा त्या प्रभाव क्षेत्रातील हजारो लोकांच्या जीवनाशी निगडित नाही का?
६)कंपनी प्रभाव क्षेत्रातील भूमिहीन शेतकरी, भूमिपुत्र,गावातील बेरोजगार यांना लाभ काय?
७)कंपनीने सोने उत्पन्न करावे आम्हाला आनंदच होईल,त्या सोन्याचा मुलामा प्रभावित गावांना किती?
८)मराठा आरक्षण रद्द झाले हा परिसर मराठा बहुल असताना प्रचंड बेरोजगारी असताना कंपनी गेट वर उभेही नाही करत याचे उत्तर मिळेल?
९)किमान वेतन नुसार पगारवाढ मिळेल?आजही कंपनीत अल्प मोबदल्यात ही तरुणाई काम करते...यावर उपाय योजना तुमच्या कृती आराखड्यात का नाही घेतली?तुम्ही उत्पादनाचे आराखडे मांडतात... रोजगानिर्मिती किती व कशी याची नोंद तुमच्या अरखद्यात का नाही?
१०)नवीन प्रकलपात किती बेरोजगारीचे प्रश्न सुटणार आहेत?
११)शेजारीच वन्य जीव व नर्सरी आहे तिला किती सुरक्षितता कंपनी देऊ शकेल.
१२) सुस्तावले ले लोकप्रतिनिधी बंद कारखान्यासाठी अटपिता करून भावनिक विषय हाताळून जनमत मिळवले...परतू नंतर आपण त्यांच्या किती पाठीशी राहिलात.
१३)कंपनीत बेरोजगारांची एमआयडीसी मध्ये भरपूर आंदोलने झाली...उपोषण झाले,साधी भेठी बेरोजगारांच्या आपल्याला घेता आल्या नाहीत?
१४)कंपनी बाबत सविस्तर लिखाण असावं हीच मीडिया कडून इच्छा आहे...
उद्योग उभे राहावे,भरभराटीस यावे ही आमची सर्व उद्योग करणाऱ्या कंपन्यांना शुभेच्छा...आम्ही तुम्हाला फुले वाहावी ..आणि तुम्ही नर्ड्यावर पाय ठेवावे..हे धोरण मात्र चालणार नाही.... पुन्हा सर्व सहभागी झाले त्यांना शुभेच्छा देतो..पुढील वेळी तयारीने लढू या.....जय हिंद..
◆ रोहीत जाधव.◆
[सचिव लोकनेते स्व पप्पू दादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान चाळीसगाव ]
1 टिप्पण्या
कंपनी आल्या दिवसापासून वादगगृस्थ तरी अशी कंपनीला शासनाने परवानगी दिली नाही पाहिजे ! त्या जागेवर अशा उदयोग चालू झाला पहिजे की! कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही गांवाल नसावा ! कारण त्या कंपनीचे नावाची सुरुवातच गुजरात अंबूजा या नावाने होते म्हणून ही कंपनी तिकडे गुजरात मध्ये गेले पाहिजे ! कारण ही कंपनी आपल्या तालुक्यातील तरुणांन रोजगार देत नाही ! पण रोजगार दिते पण बार तास ड्युटी करून मोबदला योग्य देत नाही | म्हणून ही कंपनी बंद करून नविन चालू करावे ! प्रेस रिपोर्टर व रोख ठोख प्रतिनिधी - संजू भाऊ पाटील (बाबा)
उत्तर द्याहटवा