चैत्यन तांडा येथे २० जणांनी घेतली कोव्हिशिल्ड लस! पुरेश्या लसीआभावी अनेक नागरिक प्रतीक्षेत ,लस साठा उपलब्ध करावा ही मागणी

 चैतन्य तांडा येथे २० जणांनी घेतली कोव्हिशिल्ड लस!        




चाळीसगाव: कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला कोव्हिशिल्डच्या २० डोस प्राप्त झाल्याने गुरूवार, रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत येथे ४५ वयोगटावरील २० जणांचे लसीकरण करून प्रत्यक्षात लसीकरणाला प्रारंभ करण्यात आली आहे.

                            कोरोना बांधीतांच्या मृत्यू दरात घट आणण्यासाठी सरकारने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सीन डोस घेण्याचे आवाहन केले आहे. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने ४५ वयोगटावरील नागरिकांना लस टोचण्याचे प्राधान्य देण्यात आले आहे. लसीचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने हे निर्णय घेण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागात लसीला घेऊन अजूनही संभ्रमात आहेत. परंतु करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी हे गैरसमज दूर करून आपल्या गावात अर्थात चैतन्य तांडा येथे लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी ४५ वयोगटावरील नागरिकांना प्राधान्य देऊन एकूण २० जणांचे लसीकरण करण्यात आले. ग्रामपंचायतीला गुरूवार, २७ रोजी २० डोस प्राप्त झाल्याने हे लसीकरण करण्यात आले. तत्पूर्वी बुधवार, २६ रोजी आरटीपीसीआर चे कॅम्प भरवण्यात आले होते. त्यावेळी एकूण १७ जणांनी आरटीपीसीआर ची चाचणी करून घेतली. अशा विविध उपक्रमांमुळे चैतन्य तांडा ग्रामपंचायत हे तालुक्यात अग्रेसर आहे. लसीकरणाप्रसंगी 

डॉ. संदीप पाटील, डॉ. घनश्याम राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंद राठोड, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक कैलास जाधव, एन. एम. एच. नीता, कुमावत उषा पवार, मदतनीस अंगणवाडी सेविका शोभा राठोड, आशा सेविका कविता जाधव, करगावचे माजी विकास सोसायटी चेअरमन दिनकर राठोड व ग्रामस्थ राजेंद्र चव्हाण, वसंत राठोड साईनाथ राठोड भाऊलाल चव्हाण प्रवीण चव्हाण  मधुकर राठोड, सुनील राठोड, बादल पवार व नारायण राठोड आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या