सोलापूर : आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या संपादित क्षेत्रात पोखरापूर् येथे जगदंबा देवीच्या मंदिराचे पुनरोपण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी महामार्गाच्या पुलाचे काम चालू असताना मंदिर परिसरात उत्खनन करण्यात येत आहे.या उत्खननादरम्यान जमिनीखाली एका समाधीच्या खाली दगडी बांधकामाच्या खोलीत मानवी सांगाडा आढळून आला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानंतर दिवसभर मंदिर परिसरात उत्खनन करत असताना ग्रामस्थांनी गर्दी केली होती.हा मानवी सांगाडा हा प्राचीन काळातील असून नेमका कधीचा आहे याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारपासून पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली मंदिराच्या परिसरातील उत्खनन करण्यात येत आहे. या कामादरम्यान दगडी बांधकामाच्या खोलीमध्ये एक मानवी शरीराचा सांगाडा आढळला. यानंतर पुरातत्त्व विभागाच्या वतीने या सांगड्याचे संशोधन सुरूकरण्यात आले आहे.
0 टिप्पण्या