ई - दिवाळी अंक ' स्वच्छंदी भरारीचे ' प्रकाशन.

 ई - दिवाळी अंक ' स्वच्छंदी भरारीचे ' प्रकाशन. 

भाषा व्यक्ती विकासाचे प्रभावी माध्यम आहे. साहित्य वाचनाची आवड निर्माण व्हावी, विविध भाषेतील साहित्यकृती वाचकांना आपल्या मोबाईल मध्ये उपलब्ध व्हाव्यात.साहित्यिकांचे साहित्य जनामनापर्यंत पोहोचविण्यासोबत , कागद व शाईच्या निर्मितीमुळे होणारा पर्यावरणाचा विनाश थोडया प्रमाणात कमी करण्याच्या  प्रयत्नाचा भाग म्हणून  यंदा चौथ्या  वर्षी  'स्वच्छंदी भरारी ' च्या २ ई अंकाची निर्मिती करण्यात आली आहे.  सदर दोन्ही अंकांचे प्रकाशन करगाव विकास चेअरमन दिनकर राठोड , साप्ताहिक वंचितांचा प्रतिनिधी चे संपादक  योगेश्वर राठोड, ग्लोबल बंजारा फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांच्या हस्ते . यांचे हस्ते ऑफलाईन  करण्यात आले. 2017 पासून मराठी, गोरबोलीसह विविध भाषेतील ई साहित्य असलेल्या     ई दिवाळी अंकाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.

    ई दिवाळी अंक  'स्वछंदी भरारी-2020 '  चा गोरबोली भाषेचा १ व   मराठी भाषेसह, तावडी, भिलावू,  अहिराणी,वऱ्हाडी , तडवी भाषेतील दुसरा अशा दोन्ही अंकाचे प्रकाशन विविधांगी साहित्य कृती वाचतांना रसिकांना आनंद होईल. पर्यावरण रक्षण  , लेक वाचवा , निसर्गाची स्थिती, सामाजिक बदलते स्वरुप, मानव प्रगती, शिक्षण , संवेदना व तरुणाईचा विचार , कोरोना काळातील मागोवा, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे दुःख, राष्ट्राभिमान, त्याच सोबत हुकुमशाही व दहशती विरोधी लेखणीचा प्रहार व बंजारा तांडयातील व्यथा वाचकांना मोबाईलवर वाचायला मिळेल. अशोक राठोड यांनी ऑनलाईन ई दिवाळी अंकामुळे वाचन चळवळीला बळ देण्याचे कार्य होईल असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात दिनकर राठोड यांनी ई दिवाळी अंक संपादन ही काळाची गरज आहे. कमी वेळेत अनेकांपर्यंत ई बुक स्वरुपात ऑनलाईन प्रकाशित होणारा  स्वच्छंदी भरारी अंक पोहोचले ही आनंदाची गोष्ट आहे. या अंकामुळे समाजातील लेखन व वाचन चळवळीला गती मिळेल व समाजविकासासाठी लेखक,समिक्षक व यांच्यासह सामाजिक कार्यातील विविध व्यक्ती व संस्थांचे कार्य वाचकांपर्यंत जाईल अशा भावना व्यक्त केल्या. संपादक एकनाथ गोफणे यांनी चार वर्षांपासून ई दिवाळी अंकातील विविध साहित्य व साहित्यिकांच्या कार्यांचा आढावा घेतला.अंकाचे टाईपसेटींग व इतर अनुषांगिक कार्य करणारे जयवंत गोफणे यांचा सत्कार करण्यात आला. दुर्गा गोफणे यांनी सुत्रसंचालन केले.    देशदूत चे पत्रकार गोरख गोफणे यांनी अंकासाठी लेखन करणा-या मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार  मानले.......fliphtml5.com  वर अंक अपडोड पुर्ण झाल्यावर अंकाची ऑनलाईन लिंक पाठविण्यात येईल.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या