आषाढीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन देवळी आश्रम शाळेत करण्यात आले

देवळी आश्रमशाळेत आषाढीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन




नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, देवळी येथे आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले . दरवर्षाच्या परंपरेनुसार देवळीआश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी काढत ही परंपरा अविरत चालू ठेवली. दिंडीतील पालखीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री.कैलासबापू सूर्यवंशी, संचालिका माईसो. जयश्री सूर्यवंशी, सचिव आदित्य सूर्यवंशी, संचालक श्री. ऋषिकेश सूर्यवंशी यांनी केले. तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी व सर्व संतांची, वारकरी वेशभूषा धारण करून देखावे व दिंडीतील वेगवेगळे नृत्य सादर केले. तसेच गावातील महिला व पुरुषांनी फुगडी खेळत दिंडीचे स्वागत केले.



           यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. सतीश पाटील, मुख्याध्यापक श्री. तुषार खैरनार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद सूर्यवंशी दीपमाला जाधव, भूषण बहीरम यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बोरसे तर आभार दादासाहेब दाभाडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या