मोफत गणवेश व बुट वाटप कार्यक्रम
जि.प. उच्च प्राथ. शाळा चैतन्य तांडा नं4 ता.चाळीसगाव येथे दि. 19/ 7/ 2024 रोजी सन 2025 /26 अंतर्गत शासनाकडून आलेल्या निधीतून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय बूट आणि सॉक्स जोड वितरित करण्यात आले.
यावेळी उपसरपंच महोदय श्री. आनंदा भाऊ राठोड अध्यक्ष म्हणून होते. प्रमुख पाहुणे म्हणून (विविध कार्य.सोसा. चेअरमन) श्री .दिनकर भाऊ राठोड ,(शा. व्यव.समितीचे अध्यक्ष) श्री. निंबा तवर , रमेश जाधव, दिलीप राठोड, पदम तवर, उदल पवार,गोरख राठोड,गावातील शिक्षण प्रेमी मंडळी गावातील, मुख्याध्यापक, शिक्षक बेलदार सर त्यांची टीम व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करून पुढील शनिवारी पालक सभा घेण्याचे ठरले.
मा. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हातून "एक पेड माॅ के नाम"या योजनेअंतर्गत शालेय परिसरात वडाचे झाड लावण्यात आले. आपण सर्वांनी शाळेच्या विकास व गुणवत्ते साठी सर्वतोपरी मदत करण्याचे ठरले.
युनिफॉर्म व बूट बघून विद्यार्थी व पालक आनंदि दिसले.


0 टिप्पण्या