चाळीसगाव महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी


 चाळीसगाव  : चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्ट्स एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव मध्ये आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर, प्रा. एम. ओ. अहिरे  व कार्यक्रम समिती प्रमुख प्रा. एस. वाय. पवार यांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी आपले विचार मांडताना प्राचार्य बिल्दीकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला.

   सन १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी अतिशय महत्त्वाच्या योजना राबवल्या .

ते स्वतः अतिशय उत्तम दर्जाचे लेखक होते. प्रगल्भ सांस्कृतिक जाण असलेला नेता महाराष्ट्राला, देशाला लाभला ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन केले.

  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एस. वाय. पवार यांनी केले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या