महाराष्ट्राच्या कृषी, सिंचन, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्राला दिशा देणारा अर्थसंकल्प,

उत्कृष्ट अर्थनीतीकार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर छाप – आमदार मंगेश चव्हाण



स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सादर होणारा महाराष्ट्र राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प असल्याने तसेच अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच अर्थसंकल्प सादर करत असल्याने सर्व राज्याच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे होत्या. आणि अपेक्षेप्रमाने राज्याच्या लौकिकाला साजेसा असा अर्थसंकल्प राज्याला मिळाला आहे. 


चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील विकासकामांना देखील भरीव असा निधी यानिमित्ताने मिळाला आहे, पाटणादेवी ते टेकवाडे हा १० मीटर रुंद महामार्गाला मान्यता, जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय बांधकामास मंजुरी आदी कामांमुळे विकासाला गती मिळणार आहे. 


यशस्वी मुख्यमंत्री, राजकारणातील चाणक्य, उत्कृष्ट रणनीतीकार अशी ओळख असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक उत्कृष्ट अर्थनीतीकार म्हणून आपल्या कामाची, अभ्यासाची छाप यामाध्यमातून सोडली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवान महाराष्ट्र संकल्पनेला बळ या अर्थसंकल्पामुळे मिळणार आहे.


अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास या ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे.


तसेच पीएम किसान प्रमाणे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ६ हजार रुपये अनुदान, १ रुपयात पीकविमा – शेतकऱ्यांना हफ्ता राज्य सरकार भरणार, सर्व महिलांना एसटी बस मध्ये ५० टक्के सवलत, निराधारांना अनुदानात १५०० पर्यंत वाढ, काशी विश्वनाथ – उज्जैन च्या धर्तीवर राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास, उत्तर महाराष्ट्राला संजीवनी ठरणाऱ्या नार – पार नदीजोड प्रकल्प राज्य सरकार पूर्ण करणार, देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार, महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार, शेतकर्यांरच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष असल्याने या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये, महात्मा फुले आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून 5 लाखांवर रुपये, आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडा - बंजारा तांडे रस्त्यांनी जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज - धनगर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर यांच्या नावाने तिन्ही योजनांसाठी सुमारे ४००० कोटी रुपयांची तरतूद देण्याची ऐतिहासिक घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. 


निश्चितपणे महाराष्ट्राच्या कृषी, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्राला दिशा देणारा सर्वव्यापी, सर्वन्यायी अर्थसंकल्प आहे. 



- आमदार मंगेश चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या