लोकमत विरुद्ध ठोस भूमिका घेण्याचा बंजारा समाजाचा निर्धार

 सकल गोर बंजारा समाजाच्या बैठकीत लोकमत विरुद्ध तीव्र लढा उभारण्याचा एकमुखी निर्णय



संभाजीनगर : प्रतिनिधी

  आज दिनांक २३ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात नायक श्री सुखदेव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सकल गोर बंजारा समाज बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीचा मुख्य विषय होता " मागील तीस (३०) वर्षांपासून जाणीवपूर्वक हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांची अप्रतिष्ठा करुन समाज भावनेवर वारंवार घाला घालणाऱ्या दैनिक लोकमतच्या विरोधात ठोस भूमिका घेण्याचा."  

    या बैठकीत उत्तम चव्हाण, एन. टी. राठोड, प्रा. बी.यु. राठोड, राजपाल राठोड, रविकांत राठोड, डॉ. कृष्णा राठोड, मुकेश राठोड, उगलाल राठोड, संजय राठोड, वैजीनाथ राठोड, एडव्होकेट अशोक राठोड, रोहिदास पवार, प्रा. मांगीलाल राठोड, किरण चव्हाण, प्रा.अरविंद पवार आदींनी आपले विचार मांडले.

   या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.

१. लोकमतवर बहिष्कार घालणे. राज्यातील ज्या ज्या समाज बांधवांकडे लोकमत पेपर घेतला जातो ते तात्काळ बंद करणे.

२. दिनांक २६ मार्च रोजी लोकमत विरोधात राज्यभर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे आदी ठिकाणी निवेदन देणे.

३. वसंतराव नाईक साहेबांची बदनामी करणाऱ्या नंदकिशोर यांची संपादक पदावरुन हाकालपट्टी करुन लोकमत समुहाने लेखी पत्र दिल्याशिवाय चर्चेला कोणीही न जाणे.

४. लोकमत समुहाच्या द्वेष मुलक प्रवृतीत कोणताही बदल न झाल्यास राज्यभर लोकमतची होळी करणे, विजय दर्डा व राजेंद्र दर्डा यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करणे.


  या बैठकीत वसंतराव नाईक सामाजिक न्याय हक्क कृती समिती चे गठन करण्यात आले. सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन या समिती मार्फतच लढा उभारण्याचे एकमताने ठरले.

     लोकमत समुहाच्याविरोधात लढा उभारण्याच्या विषया व्यतिरिक्त समाजाच्या इतर ज्वलंत सामाजिक विषयांवर ही यावेळी चर्चा झाली.

  अध्यक्षीय भाषणानंतर बैठकीची सांगता झाली.

    या बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक प्रा. फुलसिंग जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार उगलाल राठोड यांनी मानले. 

   या बैठकीस जी. के. राठोड, रोहिदास जाधव, शंतनु राठोड, रामेश्वर राठोड, प्रा.अरविंद पवार, रमेश राठोड, रमेश चव्हाण, योगेश राठोड, श्रीराम राठोड, प्रल्हाद राठोड, डी. व्ही. पवार, अमोल राठोड, सिताराम राठोड, कैलास राठोड, साहेबराव जाधव, दिलीप जाधव, विठ्ठल चव्हाण, एडव्होकेट सुनील जाधव, बबन चव्हाण, शंकर राठोड, राठोड किसन, अज्ञानसिंग चव्हाण आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या