ग्रुप ग्रामपंचायत जांभे कार्यालय पोचाडे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची सरपंच,उप-सरपंच यांच्या हस्ते जयंती साजरी
प्रतिनिधी - अजय लहारे
भारतातील पहीली शिक्षिका,मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रुप ग्रामपंचायत जांभे कार्यालय पोचाडे येथे साजरी करण्यात आली.
त्यावेळी मा.श्रीम.सरपंच निलम कैलास पारधी,उप-सरपंच श्री.अजय मधुकर लहारे,अंगणवाडी सेविका व मदतनिश पोचाडे तसेच सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. सावित्रीबाई या लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
0 टिप्पण्या