बंजारा समाजातील कु नेहा चव्हाण बलात्कार व खुन प्रकरणी दोशिना फाशी ची शिक्षा द्या:-अखिल भारतीय बंजारा सेना
वाशिम-बंजारा समाजाच्या मुलीवर अतिप्रसंग करुन निर्घृणपणे खून केल्याबाबत तसेच दोषींना त्वरीत जेरबंद करुन सदर प्रकरण त्वरीत जलदगती न्यायालयात पाठविणेबाबत
मा जिल्हा अधिकारी वाशिम यांना निवेदन देण्यात आले
वरील विषयास अनुसरुन आम्ही सर्व आपणांस कळवू इच्छितो की, गाव जोडगव्हाण(रामनगर) तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे शिक्षणासाठी आलेल्या मुलींवर अतिप्रसंग लेंगिक अत्याचार करुन निर्घुणपणे पाण्याने भरलेल्या विहीरीत ढकलून खुन केला आहे. मुलीच्या आईने खुनाची तक्रार दाखल करण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन, शहरी पोलीस स्टेशन तसेच आपल्या कार्यालयात सुध्दा तक्रार दाखल करण्यासाठी पायपीट करुन सुध्दा तक्रार दाखल करुन घेण्यात आली नाही
त्यासंदर्भात सदर घटनेतील दोषींना तात्काळ जेलबंद करुन जलदगती न्यायालयामध्ये प्रकरण पाठविण्यात यावे व संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबत तक्रार नोंदवून घेण्यास निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांच्यावर त्वरीत निलंबनाची कारवाई करण्यात यावी दिवसाच्या आत निलंबित करण्यात याव्ये अन्यथा आमच्या संघटनेकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
तसेच होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील ही विनंती
मा जीनकर भाऊ राठोड मा संजय राठोड मा निरंजन भाऊ राठोड मा संतोष भाऊ राठोड मा लक्ष्मण भाऊ सर्व अखिल भारतीय बंजारा युवा सेना व बंजारा सेना महाराष्ट्र
संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्हा मराठा सेवा संघ वाशिम जिल्हा यांच्या जाहीर पाठिंबा
प्रतिलीपी :-
१) मा. न. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२) मा. न. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्य मंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
३) मा.न. श्री. संजयजी राठोड साहेब, अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४) मा. न. पोलीस महानिरीक्षक पोलीस कार्यालय आयुक्त अमरावती
५) मा.न. जिल्हा पोलीस अधिक्षक वाशीम
६) मा. न. ठाणेदार साहेब शहरी व ग्रामीण वाशीम
.......................................................................
........................जाहिरात........................
0 टिप्पण्या