नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळा देवळी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळा देवळी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळा देवळी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माध्य. मुख्याध्यापक श्री.सतिष पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवमती जयश्रीताई रणदिवे (उपाध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्य) तसेच शाळेतील प्राथमिक मुख्याध्यापक श्री.तुषार खैरनार यांनी दिपप्रज्वलन करून प्रतिमापूजन केले.

      शाळेतील विद्यार्थीनी छाया चौरे व साधना पावरा यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. तसेच अंजना वसावे व निलम पावरा यांच्या गृपने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाट्य, निशा पावरा यांच्या गृपने नृत्य तर कल्पना वळवी, नंदिनी पावरा, मनिषा पावरा, अंजली पावरा यांनी वकृत्व सादर केले. 

       कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवमती जयश्रीताई रणदिवे यांनी सावित्रीबाई फुले  यांच्या कार्याचा जीवनपट मांडला. तसेच सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी यश कसे संपादन करावे याबाबत मार्गदर्शन केले.

       कार्यक्रमास मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती संगीता पाटील, श्रीमती अर्चना मोरे, श्रीमती सुरेखा पाटील, श्रीमती आम्रपाली म्हसदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. दिपमाला जाधव तर आभार श्रीमती सरला महाले यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या