ग्रामपंचायत वनोजा ग्रामसेवकाचा मनमानी कारभार व सरपंच आणि सदस्य यांना शिवीगाळ

 ग्रामपंचायत वनोजा ग्रामसेवकाचा मनमानी कारभार व सरपंच आणि सदस्य यांना शिवीगाळ

                                                                               


राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर                                                             ,                               ग्रामपंचायत वनोजा येथे काल दि- २१/१२/२०२२ रोजी पं. स.चे अभियंता हे स्मश्यानभूमी च्या जागेची मोका पाहणी करण्यासाठी आले असता जुन्या ठिकाणी स्मश्यानभूमी करण्यास योग्य जागा वा प्रेत नेण्याकरिता  रस्ता उपलब्ध नाही असे मत अभियंता साहेब यांनी मांडले असता कु. आरती वडुले, सचिव ग्रा. पं. वनोजा यांनी सांगितले की माझ्या मोबाईल मध्ये नकाशा चा फोटो आहे व त्यावर रस्ता आहे परंतु हा रस्ता नेमका कुठुन आहे याची परिपूर्ण शहानिशा न करता ग्रामस्थांना चुकीचे मार्गदर्शन करताना सरपंच यांच्या लक्षात येताच सरपंच यांनी ग्रामसेवक यांना पूर्ण प्रकरण समजून घेऊन ग्रामस्थांना माहिती द्या असे म्हणताच ग्रामसेवक यांनी सरपंच यांना अतिशय निच्च दर्जाची शिविगाळ केली. तसेच यापूर्वी देखील पद खारीज करण्याची धमकी दिली. वयोवृद्ध सरपंच यांना अभियंता, सदस्य व ग्रामस्थांन समोर अतिशय खालच्या पातळीवर बोलल्या. या प्रकरणाचा निषेध म्हणून ग्रामपंचायत वनोजा अंतर्गत सरपंच सौ.चंदाताई पोटरकर, उपसरपंच श्री. प्रभाकर दांडेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. चंदुभाऊ उगेमुगे ,सौ. मालुताई कोटनाके ,ग्रा. वि. सोसायटी चे संचालक श्री. प्रफुलभाऊ तायवाडे , ग्रामस्थ श्री. हरिदास बुरघाटे,प्रफुल्ल गुडधे, शरद धोंगडे, प्रशांत काचोळे ,जितेंद्र खोडे, व इतर ग्रामस्थांनी तसेच सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. अंकुशभाऊ मुनेश्वर, आदर्श गाव रावेरी चे सरपंच श्री. राजुभाऊ तेलंगे,,ग्रा. पं. वालधुर चे सरपंच श्री. मोहनराव नरडवार,विजयभाऊ येनोरकर यांनी पं. स.चे गट विकास अधिकारी श्री. केशव पवार साहेब यांना निवेदन दिले व सदर ग्रामसेवक मॅडम ची बदली करून देणे बाबत विनंती करण्यात आली. अन्यथा ग्रामपंचायत वा गावामध्ये कोणत्याही प्रकारचं वाईट प्रकार घडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.

येत्या 15 ते 20 दिवसात सचिव आरती वडुले यांची बदली करून हे प्रकरण निकाली काढण्याचा शब्द मा. गटविकास अधिकारी साहेबांनी दिला.















...........................जाहिरात...............................




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या