राळेगांव तालुक्यातील सात ग्रामपंचयात निवडणुकीचा निकाल जाहीर
राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर 8208260998
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत तालुक्यातील मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचतीच्या निवडणुकीचा निकाल दिं २० डिसेंबर २०२२ रोज मंगळवारला जाहीर झाला असून या आठ ग्रामपंचायतीपैकी सात ग्रामपंचायतीच्या निकाल जाहीर झाला तर परसोडा ग्रामपंचायतीचा निकाल थांबविण्यात आला असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.
यावर्षी घेण्यात आलेल्या निवडणुककित सरपंच पद हे जनतेतून निवडून दिल्या जात असल्याने झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती.यावेळी काही दिवसातच होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीकडे आमदार पासून तर जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य लक्ष लावून होते.तेव्हा या ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकीत सरपंच आमचाच असावा असे चित्र पहावयास मिळाले आणि अखेर निकाल जाहीर होताच गुलाल उधळत होते .
या लागलेल्या निवडणूक निकालात तालुक्यात *जागजई* ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून स्वप्निल विनोद जयपुरकर तर *सदस्य* म्हणून लहू रामाजी सातपुते, नीता किसन तोडासे, अविन भीमराव पेंदाम,शारदा प्रवीण सोनटक्के, सविता संजूपाल कांबळे, सचिन शंकर गडदे, रंजना पांडुरंग तपासे, *उंदरी* येथील सरपंच म्हणून गोपाल नारायण राऊत *सदस्य* म्हणून चिरदेव यंकुजी तोडासे, ज्योती मनोज नाखले, चंदा नंदू कंगाले, अनिल वासुदेव तडस, अंकिता राजू तिवाडे, शुभम भगवान बेलखडे, किरण गोविंद कावडे, *वाठोडा* येथील ग्रामपंचायत सरपंच म्हणून गजीता जनार्दन मरस्कोले *सदस्य* उमेश सुरेश हरणे ,मनीषा राहुल लाकडे, सुवर्णा कैलास धनविज, मंगेश राजू झोटिंग, संगीता सुधाकर कोडापे, प्रवीण बाबाराव तुरनकर, प्रतिभा उमेश केराम *पिंपळगाव* ग्रामपंचायत सरपंच म्हणून मनीषा अंकुश वानखेडे *सदस्य* प्रवीण रमेश महाजन, रूपा शंकर ढेंगळे, शालू राजू टेकाम, अभय मनोहर मासुरकर, नरेंद्र गंगाराम आत्राम, जनाबाई सुरेश तडस, सीमा संजय बेहेरे, *श्रीरामपूर*
येथील सरपंच म्हणून किसन जगन झाडे *सदस्य* जानराव ताणबाजी भुढे, वर्षा हरी ढूमनवार, मारोती लक्ष्मण आडे, प्रतिभा तुरुचंद फुलमाळी, सीमा नरेंद्र आडे, मंदा भारत पाल, महादेव लक्ष्मण मेश्राम,*बंदर* येथील सरपंच म्हणून इंदल गोबरुजी राठोड *सदस्य* भास्कर बापूराव राठोड, संगीता सुभाष जाधव, बेबी संजय जाधव, विनोद फकीरा राठोड, संजय माणिक भारी, मंदा तुकाराम मेश्राम, (अविरोध) तर एक रिक्त *मंगी* येथील सरपंच पदासाठी व वार्ड क्रमांक एक करिता निवडणूक घेण्यात आली असून सहा वार्डात सदस्य पदाकरिता अविरोध निवड करण्यात आली यामध्ये *सरपंच* म्हणून सचिन गणपत टोंग तर *सदस्य* म्हणून सचिन रमेश सरोदे हे निवडून आले तर अविरोध म्हणून छाया दादाराव रामगडे, शिल्पा मारोती राऊत, वाल्मीक अंबादास कोंडेकर, रवींद्र गणपत वडस्कर, मंगला श्रीकांत खडसे, ज्योती संजय सरोदे, अविरोध निवडून आले आहेत.
.............................जाहिरात.............................
0 टिप्पण्या