नितीशजी कराळे सर यांची सावरखेड येथे भेट
सावरखेड:दि.25 डिसेंबर ला फिनिक्स करियर अकॅडमी वर्धा चे संचालक, माय बोलीत शिक्षण देणारे प्रयोगशील शिक्षक श्री.नितीशजी कराळे सर यांनी सावरखेड येथे भेट दिली,अमित ढोबळे मित्र परिवारा तर्फे छोटी खाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,त्यांना आयोजकांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली,श्री.कराळे सर यांनी समाजसेवा करीत असताना सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ,सर्वांच्या सहकार्याने समाजाचा विकास होत असतो,शिक्षण आपण घेतले पाहिजे त्या मुळे आपला स्वतःचा,समाजाचा,देशाचा विकास होतो असे मनोगत व्यक्त केले ,हा कार्यक्रम आयोजित केल्या बदल श्री .कराळे सर यांनी आयोजकांचे आभार मानले.
0 टिप्पण्या