वाशिम ते अकोला मार्गे शेलुबाजार बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल

 वाशिम ते अकोला मार्गे शेलुबाजार बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल

मनसेचा विभागीय नियंत्रकांना निवेदनाव्दारे आंदोलनाचा इशारा

वाशिम - वाशिम ते अकोला मार्गे शेलुबाजार, पिंप्री अवगण, तांदळी, कोंडाळा, सोयता, माळेगाव ही एस.टी. बससेवा गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत आहे. सदर एसटी बस सेवा पुर्ववत सुरु करुन ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी २६ डिसेंबर रोजी आगारप्रमुखाव्दारे विभागीय नियंत्रकांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

    निवेदनात नमूद आहे की, गेल्या काही वर्षापासून सुरु असलेली वाशिम ते अकोला मार्गे शेलुबाजार, पिंप्री अवगण, तांदळी, कोंडाळा, सोयता, माळेगाव अशी एसटी बस सेवा गेल्या चार महिन्याआधी पासुन प्रवाशांना कोणतीही पुर्वसुचना न देता बंद करण्यात आली आहे. ही बससेवा बंद झाल्यामुळे या मार्गावर असलेल्या गावखेड्यातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जवळपासच्या खेड्यातून शहरातील शाळांमध्ये जाणार्‍या विद्याथ्यार्र्ंना येनकेनप्रकारे नाहक जास्तीचे पैसे खर्चून खाजगी वाहनाने जावे लागत आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकांनाही दवाखाने वा अन्य तत्सम कामासाठी वाशिम किंवा अकोला येथे जाण्यासाठी फेर्‍याने जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून वाशिम ते अकोला मार्गे शेलुबाजार एसटी बससेवा पुर्ववत सुरु करुन प्रवासी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. निवेदनावर त्वरीत कार्यवाही न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या