ब्रम्हा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेची स्थापना
वाशिम - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचार ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी मनसे संपर्क नेते विठ्ठल लोखंडकर यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात २८ डिसेंबर रोजी तालुक्यातील ग्राम ब्रम्हा येथे शाखा स्थापनेचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधी व जनहितचे जिल्हाध्यक्ष अॅड. नामदेव जुमडे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष रघुनाथ खूपसे, शहर उपाध्यक्ष प्रतीक कांबळे, जनहितचे मंगरूळनाथ तालुकाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष मुसळे, ग्रा.पं. सदस्य हरिभाऊ मुसळे, मा. सदस्य नामदेवराव यशवंत, विलासराव मुसळे, सोसायटी सदस्य बाबुराव मुसळे, ग्रा. पं. सदस्य प्रदीप मुसळे, विद्यार्थी सेनेचे मा. तालुकाध्यक्ष यश चव्हाण, अनंता ढोके यांची उपस्थिती होती. यावेळी सर्कल अध्यक्ष अनिल मुसळे, संघटक संतोष यशवंत, शाखा अध्यक्ष सुधाकर मुसळे, कार्याध्यक्ष विष्णु मुसळे, उपाध्यक्ष राजेंद्र मुसळे, सचिव किशोर शेनकुडे, कोषाध्यक्ष सतिश मुसळे, शाखा सदस्य विष्णु मुसळे, लक्ष्मण कुटे, सोहंम जिरवणकर, अविनाश कुर्हे, ओंकार नवघरे, देवानंद रणखांबे, महादेव इंगळे, दत्ता घुगे, गणेश कुटे, नारायण मुसळे, विशाल धोंगडे, गोपाल मुसळे, राम मुसळे, राजेश भड, शाम मुसळे, अजय घुगे, राहुल मुसळे, गोपाल मुसळे, नेहाल मुसळे, महादेव भड, शिवाजी नवघरे, आशिष डाळे, ऋषी सरोदे, दिपक पंडीत, ऋषिकेश पंडीत, निलेश नवघरे, राजु नवघरे, विनोद कुटे, भगवान मुसळे यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या