ग्रुप ग्रामपंचायत जांभे अंतर्गत येणार्या गाव-पाड्यावरती घरकुल बांधण्यास सुरूवात. . . .

 ग्रुप ग्रामपंचायत जांभे अंतर्गत येणार्या गाव-पाड्यावरती घरकुल बांधण्यास सुरूवात. . . . 

   प्रत्येक वंचित लाभार्थाला घर देवून त्यांच्या निवाराचा प्रश्न सोडवण्यास आम्ही कटिबद्ध. . . सरपंच व उप-सरपंचाचं प्रतिपादन. . 

   तालुका-विक्रमगड जिल्हा-पालघर

   विक्रमगड-११ डिसेंबर २०२२ 

विक्रमगड तालुका प्रतिनिधी-अजय लहारे

विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जांभे येथील वंचित असलेले घरकुल लाभार्थांची पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल बांधकामाची कामे चालु करण्यात आलेली आहेत व प्रत्येक वंचित लाभार्थापर्यंत पंतप्रधान आवास योजना तसेच शबरी आवास योजने अंतर्गत लाभ देवून प्रत्येकाला एक पक्के घराचं स्वप्न पुर्ण करु असे प्रतिपादन सरपंच निलम पारधी व उप-सरपंच अजय लहारे यांनी केलेले आहे. तसेच जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये विकास कामं कसे होतील? याच्यासाठी पुर्ण प्रयत्न करुन स्थानिक प्रशासनाची व लोकप्रतिनीधीची मदत घेवुन ग्रामपंचायत्या विकासाला चालना देवु असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. गावाच्या विकासासाठी मा.आमदार,मा. खासदार,जिल्हापरिषद अध्यक्ष व पंचायती समिती सभापती व अध्यक्ष यांनी सुद्धा मदत करावी अशी मागणी केलेली आहे. 

      देशाची प्रगती करायची असेल तर पहील्यांदा गावाचा विकास व समाजाचा विकास करणे गरजेचे असते असे प्रतिपादन उप-सरपंच अजय लहारे यांनी केलेले आहे. 













..........................जाहिरात..........................





      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या