यवतमाळ जिल्हास्तरीय मैदानी धावण्याच्या स्पर्धेत कु आचल झाडें ची गगनभरारी

 यवतमाळ जिल्हास्तरीय मैदानी धावण्याच्या स्पर्धेत कु आचल झाडें  ची गगनभरारी                             


विजेती स्पर्धेक  17 वर्ष वयोगटातील मुलीच्या धावण्याच्या विभागीय स्पर्धेस पात्र



राळेगाव तालुका प्रतिनिधि -विलास साखरकर               

यवतमाळ जिल्हा स्तरीय 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या धावण्याच्या मैदानी स्पर्धा  नेहरू क्रीडागण यवतमाळ येथे दिनांक 8 डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील 17 वर्ष वयोगटातील वर्ग 10 वी ची कु आचल गजानन झाडें ही विद्यार्थीनी 1500 मिटर धावण्याच्या झालेल्या अंतिम स्पर्धेत  अंतिम विजेती ठरली आहे.  तर विजेती खेडाळू अमरावती विभागीय  स्पर्धेत जिल्ह्यातून 1500 मिटर धावण्याच्या स्पर्धेस पात्र ठरल्या मुळे कु आचल झाडें या विजेत्यां  खेडाळूवर  जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.सदर विजेत्यां खेडाळू ला शाळेतील तालुका क्रीडा संयोजक प्रफुल्ल खडसे, नरेश दुर्गे व शाळेतील क्रीडा शिक्षक  विजय कचरे,किशोर उईके, सूचित बेहरे,यांनी मार्गदर्शन केले असून विजेत्यां खेडाळूचे जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ ,  न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव चे अध्यक्ष बी. के. धर्मे,सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे,  व शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.....












..........................जाहिरात..........................





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या