सहाय्यक शिक्षकाची गारगोटी शाळेवरील प्रतिनियुक्ती रद्द करा
(नागाई पोड येथील गावकऱ्यांचा आंदोलनाचा ईशारा)
राळेगाव शाळेत असणाऱ्या शिक्षकाची पटसंख्येच्या नावाखाली प्रतिनियुक्ती करण्यात आली असुन त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ती प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी करून ही प्रतिनियुक्ती रद्द न झाल्यास आंदोलनाचा ईशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
राळेगाव तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी बहुल असलेल्या शाळेची पटसंख्या २६ असुन शाळेमध्ये कार्यरत असलेले दोन्ही ही शिक्षक शाळेवर रुजू झाले तेव्हा पासुन शाळेची प्रगती चांगली आहे. त्यांनी कोरोना काळात मुलांना चावडी मध्ये कोरोनाचे नियम पाळून शिक्षण दिले. परंतु पटसंख्या कमी असल्याचे कारण यातील कुडमेथे नामक शिक्षकाची गारगोटी येथील शाळेवर प्रतिनियुक्ती केली.आदिवासी समाज शिक्षणापासून कोसो दूर आहे.जर अज्ञानि, अशिक्षित आदिवासी समाजाची प्रगती होण्याकरीता शिक्षकाला शाळेवर परत केले तर मुलाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही त्यामुळे एस. के. कुडमथे यांची प्रति नियुक्ती रद्द करून त्यांना नागाई पोड शाळेवर पुन्हा रुजु करावे अन्यथा मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या चांगल्या भविष्या साठी आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल अशा आशयाचे निवेदन पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिले आहे.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, मनसे तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, शेतकरी तालुकाध्यक्ष संदिप कुटे, विनोद जांबुळकार, रवी मुंडाली, सरपंच्या राधाबाई टेकाम, प्रेमिला जांभुळकर, रेखाबाई बिल्लारी, प्रेमिला जांभुळकर, सुनंदा रामपुरे, रत्नमाला कुमरे, नीता मुंडली, छाया मुंडली, बेबीबाई जांभुळकर, आकाबाई कोंडेकर, सखुबाई आत्राम, कमलाबाई जांभुळकर, चंदाबाई जांभुळकर, जोशीला फुटकी, नंदकिशोर टेकाम, रमेश जांभुळकर, दिवाकर कोंडेकार, खुशाल कोंडेकर, बंडू येडसे, वसंता टेकाम, अनिल कुटकी, रमेश कुटकी, नागेश कुटकी, भीमराव मेटकर, मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि नागाई गावातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या