महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिले मालेगाव तालुक्यातील चालु असलेले अवैध धंदे बंद करणे बाबत पत्र
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब वाशिम.
मा. जिल्हा अधिकारी साहेब वाशिम.
मा. पोलीस निरीक्षक मालेगाव.
मा. पोलीस निरीक्षक शिरपूर
मा. जिल्हा अध्यक्ष वाशिम
यांना मालेगाव तालुक्यातील चालु असलेले अवैध धंदे बंद करणे बाबत पत्र देण्यात आले.पोलीस स्टेशनं मालेगाव तालुख्याच्या अंतर्गत येत असलेल्या गावामध्ये हप्ते वारी देवाण घेवाण करून जनसामान्यांच्या उरावर राजरोज पणे दारू वरली मटका जुगार व वाहतूक अवैध धंदे सुरु असून बऱ्याच लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत.
परंतु कोणीही ब्र शब्द काढायला तयार नाही कारण त्या सर्वांना माहित आहे पोलीस अधिकारी आणि अवैध धंदे वाल्यांची मिलीगत आहे.
तरीहि आपल्या वेयक्तिक आर्थिक स्वर्थासाठी लोकांच्या जीवाशी खेळू नका हि नम्र विनंती तरी सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालेगाव पोलीस स्टेशनं समोर उपोषण करण्यात येईल
असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला
जिल्हा अध्यक्ष मनिषभाऊ डांगे यांच्या मार्गदर्शनातं
मालेगाव तालुका अध्यक्ष गजानन पाटिल कुटे यांच्या नेतृवांत निवेदन देण्यात आले.
या वेळी तालुका उपअध्यक्ष रामेश्वर वाघ शिरपूर शहर अध्यक्ष सुनिल देशमुख, ज्ञानेश्वर चव्हाण अनिल राऊत योगेश कांबळे लक्ष्मण चव्हाण इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
0 टिप्पण्या