नागाई येथील अवैध्य दारूविक्री विरोधात मनसेचा एल्गार
(मनसे च्या नेतृत्वात महिलाची वडकी पो. स्टे. वर धडक)
राळेगाव ग्रामीण प्रतिनिधी : शैलैष आडे
राळेगाव अवैधदारू विक्रीने अनेक संसार उध्वस्त झाल्याची उदाहरणं आहेत. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो. लहान मुलेही दारूच्या आहारी जात असल्याने गावगाडा बिघडतो, राळेगाव तालुक्यातील मौजा. नागाई येथे हाच प्रकार सुरु आहे. कुठलाही परवाना नसताना खुलेआम अवैद्य दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. वारंवार तोंडी तक्रार करून देखील काहीच होतं नसल्याने आज महिलांच्या संयमाचा बांध अखेर फुटला, मनसे च्या नेतृत्वात शेकडो महिलांसह नागरिकांनी वडकी पोलीस स्टेशनंवर धडक दिली. गावातील अवैध देशी दारू विक्री बंद करा अशा मागणीचे निवेदन त्यांनी दिले.
या बाबत येथील स्थानिक महिलांनी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी व संबंधित पोलिस कर्मचारी वारंवार तक्रार करून सुद्धा ही अवैद्य दारू विक्री बंद होत नाही किंवा याबाबत कुठलाही कारवाही झालेली नाही सदरील चालू असलेली अवैद्य दारू विक्री बंद करण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन असमर्थ असल्याने येथील महिलांनी नागरिकांनी गेल्या काही दिवसापूर्वी पत्राद्वारे कळवतो की नागाई या गावात चालू असलेल्या अवैद्य दारू विक्रीने महिलांना शाळकरी विद्यार्थ्यांना व इतर सामाजिक घटकांना त्रास होऊन गावाची शातंता व सुव्यवस्था लोप पावत चाललेलि आहे तरीही आपण या प्रकरणावर तात्काळ कठोर कारवाई करून या अवैद्य दारू विक्री चालकांना पाय बंद करावे अन्यथा आम्हास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे उग्र व तीव्र रूपाचे आंदोलन छेडावे लागेल. यानंतर होणाऱ्या परिणामास आपण सर्वांशी जबाबदार राहील.
यावेळी मनसे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, मनसे वाहतूक तालुकाध्यक्ष आरीफ शेख, शेतकरी अध्यक्ष संदीप कुटे, विभाग अध्यक्ष दिपक वरटकर, विभाग उपाध्यक्ष सचिन बोंडे, विभाग उपाध्यक्ष अमर आत्राम, विनोद जांबुळकार, रवी मुंडाली, सरपंच्या राधाबाई टेकाम, प्रेमिला जांभुळकर, रेखाबाई बिल्लारी, प्रेमिला जांभुळकर, सुनंदा रामपुरे, रत्नमाला कुमरे, नीता मुंडली, छाया मुंडली, बेबीबाई जांभुळकर, आकाबाई कोंडेकर, सखुबाई आत्राम, कमलाबाई जांभुळकर, चंदाबाई जांभुळकर, जोशीला फुटकी, नंदकिशोर टेकाम, रमेश जांभुळकर, दिवाकर कोंडेकार, खुशाल कोंडेकर, बंडू येडसे, वसंता टेकाम, अनिल कुटकी, रमेश कुटकी, नागेश कुटकी, भीमराव मेटकर, मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि नागाई गावातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या