जागतिक महिला दिनानिमित्ताने आदिवासी विकास विभागातील प्रकल्प कार्यालय - जव्हार येथे आदिवासी विद्यार्थिनी बनल्या एका दिवसाच्या प्रकल्पाधिकारी...

 जागतिक महिला दिनानिमित्ताने आदिवासी विकास विभागातील प्रकल्प कार्यालय - जव्हार येथे आदिवासी विद्यार्थिनी बनल्या एका दिवसाच्या प्रकल्पाधिकारी...

 

मोखाडा प्रतिनिधी - रामदास गाडर


         दि. ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय - जव्हार जि. पालघर येथे महिला दिन साजरा करण्यात आला.

        या कार्यक्रमाच्या निमित्ताने मा.प्रकल्प अधिकारी - आयुषी सिंह ( भा.प्र.से. ) यांनी कातकरी या आदिम  जमातील विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन एका दिवसाचा प्रकल्प कार्यालयातील विविध विभागातील पदभार सोपविण्यात आला.

      कार्यालयातील प्रकल्प अधिकारी म्हणून कुमारी. रंजना अनंता वाघ यांची नेमणूक करण्यात आली तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून (प्रशासन विभाग) कुमारी.प्रियंका कृष्णा वाघ,तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( विकास विभाग ) कुमारी.ममता संतोष शिसव व सहाय्यक प्रकल्प  शिक्षणाधिकारी म्हणून कुमारी.वैशाली विजय शिसव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच नियोजन अधिकारी म्हणून कुमारी. दिक्षा जिवल्या पवार प्रकल्प सहाय्यक अधिकारी ( वसति गृह/ बांधकाम) श्रीम.कलावंती जानू वळवी. प्रकल्प लेखाधिकारी कुमारी.पुजा काशिनाथ भोये यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागातील त्यांच्या विभागातील नवीन पद दिले व सर्व कामकाज समजावून दिवसभराच्या कामाला सुरुवात करण्यास सांगितले.

        सदर विद्यार्थिनींनी अधिकारी म्हणून प्रत्यक्ष कामाचा अनुभव आल्यामुळे भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनून समाजघटकांना नक्कीच न्याय मिळवून देणार असा आशावाद व्यक्त केला आहे.तसेच विद्यार्थिनींनी एका दिवसाचा प्रकल्प कार्यालयाचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या मा.प्रकल्पाधिकारी मॅडम - आयुषी सिंह यांचे आभार व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या