अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करसन राठोड यांची व राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक यांची वसंतनगर येथे बैठक संपन्न
( बंजारा समाजाच्या विविध विषयांवर चर्चा व कार्यकर्ते मेळावा संपन्न )
पारोळा प्रतिनिधी वसंत नगर तांडा तालुका पारोळा येते बंजारा हृदयसम्राट बंजारा समाजाचे नेते अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कांतीलाल जी नायक यांची बंजारा युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करसनभाऊ राठोड यांनी भेट घेतली. या भेटीत समाजाविषयी चर्चा करण्यात आली, तसेच सध्या चालू असलेले सुरक्षारक्षकांच्या न्याय हक्कासाठी आजाद मैदान मुंबई येथे अन्नत्याग आमरण उपोषण करणारे सतिश एस राठोड (पत्रकार) यांच्या कार्याबद्दल व त्यांनी सुरक्षारक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या लढ्याबद्दल चर्चा करण्यात आली, व त्यांना फोन लावून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली, तसेच पत्रकार सतिष राठोड त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांनी समाजासाठी व गरिब सुरक्षारक्षकांसाठी केलेल्या कार्याबद्दल अखिल भारतीय बंजारा सेनेतर्फे त्यांचा लवकरच जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. असे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक यांनी जाहीर केले.
बंजारा सेना, बंजारा युवा सेना, बंजारा विद्यार्थी सेना, बंजारा महिला सेना, बंजारा शेतकरी सेना महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची तसेच सदस्यांची लवकरच प्रशिक्षण शिबिर व जन संपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी अखिल भारतीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल जी नायक, युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करसन भाऊ राठोड, शेतकरी सेनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शामभाऊ जाधव, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष अरविंद जाधव, विजय जाधव, नवल जाधव, रमेश जाधव, इंदल जाधव, तसेच इतर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या